विवाहित महिलेसोबत आमदार लॉजवर; पाठलाग करत तिचा पतीही पोहोचला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat News : गुजरातमधील विसावदर विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार भूपेंद्र भाई उर्फ ​​भूपत भाई भयानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Surat AAP MLA Viral Video) होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भूपत भयानी हे एका महिलेसोबत हॉटेलमध्ये चेक इन करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भूपत भयानी एका विवाहित महिलेसोबत हॉटेलमध्ये गेले होते. यानंतर थोड्याच वेळाने त्या महिलेचा पती तिथे आला. महिलेचा पती आल्यानंतर आमदार भयानी हे तिथून निघून गेले.

महिलेला कोणी ओळखू नये म्हणून तिने तोंडाला कपडा बांधला होता. आमदाराने हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी सर्व काळजी घेतली होती पण अचानक सगळा प्लॅन फसला आणि भूपत भयानी पकडले गेले. भयानी हॉटेलमध्ये पोहोचताच काही वेळानेच महिलेचा नवरा हॉटेलमध्ये पोहोचला. तापलेलं वातावरण पाहता आमदार भयानी तोंड लपवत हॉटेलमधून पळून गेले.

ही सर्व घटना सुरतमधील वडोदरा भागातील सूरज गेस्ट हाऊसमध्ये घडली. रजिस्टरमध्ये नोंदणी केल्यानंतर आमदार भूपत भाई भयानी महिलेसोबत गेस्ट हाऊसच्या खोलीत गेले. काही वेळाने त्या महिलेचा नवराही गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला. महिलेच्या पतीला पाहताच भूपेंद्रभाई उर्फ ​​भूपत भाई भयानी तोंडाला रुमाल लपवून गेस्ट हाऊसच्या बाहेर धावत आले. 8 जून रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार भूपेंद्र भाई सुमारे 50 मिनिटे गेस्ट हाउसच्या खोलीत थांबले होते. खोलीचे 800 रुपये भाडेही त्यांनी भरले होते. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पती गेस्ट हाऊसमध्ये पोहोचताच भयानी घाबरले आणि तोंडाला रुमाल लावून ते शांतपणे निघून गेले. भूपेंद्र भाई यांचा हा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

आमदाराने दिलं स्पष्टीकरण

जुनागढच्या विसावदार मतदारसंघाचे आमदार भूपत भायणी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा राजकारणाचा निकृष्ट प्रकार आहे, मी सेवा करत आलो आहे आणि करत राहीन, पण ज्यांना माझी ही सेवा दिसत नाही, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी हे काम केले आहे,” असे भूपत भयानी म्हणाले.

कोण आहेत भूपत भयानी?

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भूपत भाई भयानी यांनी भाजप सोडत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. या जागेवरून भाजपने काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या हर्षद रिबडिया यांना तिकीट दिले होते. तर काँग्रेसकडून करण वडोदरिया निवडणुरीच्या रिंगणात उतरले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत भूपत भाई भयानी यांनी हर्षद रिबडिया यांचा 6,904 मतांनी पराभव केला. भूपत भयानी यांना 65,675 आणि हर्षद रिबडिया यांना 58,771 मते मिळाली. भूपत भयानी हे यापूर्वी भेसण व विसावदरचे सरपंचही होते. भूपत भयानी हे मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी ओळखले जातात. सध्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

Related posts