Biporjoy Cyclone Transform Into Very Severe Cyclonic Storm IMD Issues Alert Biporjoy Cyclone Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाचं (Cyclone Biporjoy) संकट वाढतंच चाललं आहे. आता चक्रीवादळानं अधिक रौद्र रुप धारण केलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचं अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झालं आहे. भारताच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका आहे. पुढील 48 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे. 

‘बिपरजॉय’चं अतितीव्र श्रेणीत रुपांतर

अत्यंत तीव्र बिपरजॉय चक्रीवादळाचं मंगळवारी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे.’ आयएमडीने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

चक्रीवादळाचं वाढतं संकट! 

चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 195 किलोमीटरवरुन ताशी 180 किलोमीटरपर्यंत खाली घसरला. चक्रीवादळातील वाऱ्यांची गती कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात आज देखील वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजराजच्या किनारपट्टी भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारताच्या किनारपट्टीवर धडकणार

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टी भागात धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. चक्रीवादळामुळे या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरातच्या किनारपट्टीवर NDRFच्या तुकड्या तैनात

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. एनडीआरएफच्या (NDRF) चार तुकड्या गुजरातच्या किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. कोस्टगार्डकडून रिफायनरीज मध्ये अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोस्टगार्ड आणि सुरक्षा दल देखील गुजरात किनारपट्टी भागात मदतीसाठी तैनात करण्यात आलं आहे.



[ad_2]

Related posts