LGBTQ Community Mental Health Challenges; LGBTQ+ कम्युनिटीच्या व्यक्तींना असू शकतात मानसिक समस्या, नकारात्मक शब्दांचाही त्रास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आत्महत्येचे विचार

आत्महत्येचे विचार

LGBTQ+ समाजातील व्यक्तींच्या मनात सतत टोमणे ऐकून अथवा पाठिंबा न मिळाल्याने आत्महत्येचे विचार बऱ्याचदा घोंगावत राहतात. याशिवाय ते स्वतःला अनेकदा नुकसानदेखील पोहचवतात. मानसशास्त्रज्ञांनुसार, सतत नकार आणि भेदभाव समाजाकडून करण्यात येत असल्यामुळे असं होतं.

नैराश्य आणि चिंता

नैराश्य आणि चिंता

LGBTQ+ समाजातील व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंता अर्थात Depression-Anxiety अधिक प्रमाणात पाहायला मिळते. सतत होणारा भेदभाव आणि समाजासह स्वतःच्या मनाशी लढा असतो आणि यामुळे सतत नैराश्याच्या गर्तेत गेल्याने मानसिक आरोग्य चांगले राहात नाही. तसंच आपली ओळख लपविण्याचा सतत दबाव त्यांच्या मनावर असतो.

(वाचा – थंड-गरम पदार्थ खाऊन दातात झिणझिण्या येत असतील तर वापरा घरगुती उपाय)

अंमली पदार्थांचे सेवन

अंमली पदार्थांचे सेवन

आपली ओळख लपविण्याचा दबाव आणि भावनिक त्रासामुळे LGBTQ+ समाजातील व्यक्ती बरेचदा नशेच्या आहारी जात अंमली पदार्थांचे सेवन करू लागतात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘अशा व्यक्ती बरेचदा दारू आणि ड्रग्जचा आधार घेतात’.

(वाचा – खाणंपिणं न सोडताही पोटावरची चरबी विरघळून मिळेल परफेक्ट फिगर, करा ४ योगासने)

इटिंग डिसऑर्डर

इटिंग डिसऑर्डर

LGBTQ+ समाजातील व्यक्ती या आपल्याला अधिक चांगले दिसायचे आहे असं मनात गृहीत धरून ठेवतात, त्यांच्या सौंदर्याच्या व्याख्याही वेगळ्या असतात आणि या सर्व गोष्टींमध्ये इटिंग डिसऑर्डरच्या आहारी जातात. Disorder हा आजार होमोफोबिया (जो होमोसेक्शुअल अथवा बायसेक्शुअल व्यक्तींना पाहून होतो) आणि लाजेशी संबंधित असतो.

(वाचा – ऑफिसमध्ये बसल्यामुळे वाढत आहेत Belly Fat? या दोन पदार्थांना करा कायमचे दूर आणि व्हा सडपातळ)

नकाराची भीती

नकाराची भीती

LGBTQ+ समाजातील अनेक व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्ती, मित्र आणि जोडीदार यांच्याकडून सतत नकार येण्याची भीती मनात निर्माण झालेली असते. मानशास्त्रज्ञांनुसार, आपल्या ओळखीचा संघर्ष करणाऱ्या मुलामुलींनी त्यांच्या स्वतःच्या घरातूनच पाठिंबा मिळत नाही आणि त्या तणावात मानसिक समस्या अधिक वाढू लागते.

एकटेपणा

एकटेपणा

ओळख लपविण्यामुळे व्यक्तीची अधिक घुसमट होते आणि त्यामुळे दुहेरी जीवन जगण्यातून एकटेपणा जाणवायला लागतो. तसंच त्याला समाजातील लोकांचीही या गोष्टीमुळे भीती वाटू लागते. यामुळे तणावाची पातळी वाढून सतत एकटेपणा वाढतो आणि त्याचा सर्व ताण मनावर पडून मानसिक आरोग्य अधिक बिघडते.

[ad_2]

Related posts