Delhi Farmers Protest Farmers to resume march to Delhi from today Penal section 144 applied police ups vigil at borders marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ची (Chalo Delhi) हाक दिली आहे. शेतकरी संघटनाच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन अलर्टवर आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांची ‘चलो दिल्ली’ची हाक

पंजाबमधील विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीवर मोर्चा नेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. त्यामुळे आज राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी दाखल होण्याची शक्यता आहे. एमएसपीवर (MSP) कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो मार्च’ 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला होता, त्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केल्यानंतर आजपासून पुन्हा हा मार्च सुरु करण्यात आला आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts