Out of the Top-500 companies in the country only 8 companies have women at the helm

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Womens Day : अवघ्या दोन दिवसांनी 8 मार्च रोजी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जाणार आहे. याआधीच, सर्व प्रयत्न करुनही देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचा सहभाग फारसा वाढला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. देशातील टॉप 500 कंपन्यांची यादी ‘फॉर्च्यून इंडिया-500’ पाहिली तर केवळ 8 कंपन्यांच्या प्रमुखपदी महिला आहेत.

फॉर्च्यून इंडिया आणि एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने केलेल्या संयुक्त अभ्यासात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही संस्थांनी देशातील टॉप 500 कंपन्यांपैकी केवळ 1.6 टक्के महिला या कंपनीच्या प्रमुख आहेत. याशिवाय फॉर्च्युन इंडिया नेक्स्ट-500 कंपन्यांचा डेटाही अभ्यासात तपासण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची संख्या सुमारे 5 टक्के आहे. अशा प्रकारे हा आकडा 25 कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, एकूण चित्र पाहिल्यास देशातील सुमारे 1000 कंपन्यांपैकी केवळ 33 कंपन्या महिला चालवतात.

भारतातही  पुरुष आणि महिलांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत फरक

फॉर्च्यून इंडिया आणि एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या अभ्यासातही देशातील उद्योगातील नेतृत्वाच्या भूमिकेतील पुरुष आणि महिला यांच्यातील फरक दिसून आला आहे. हा अभ्यास महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरु येथे सुमारे 16 गोलमेज बैठका झाल्या. यामध्ये उद्योगांचे सुमारे 130 प्रतिनिधी सहभागी झाले होते. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वत: या अभ्यासाची माहिती जाहीर केली आहे. हा अभ्यास लैंगिक असमानतेची स्वीकृती आणि उद्योग आणि कंपन्यांमध्ये करिअर वाढीच्या संधी यावर केला होता. फॉर्च्युन इंडिया त्यांच्या उत्पन्नावर आधारित भारतातील सर्वोच्च 500 कंपन्यांची वार्षिक यादी प्रकाशित करते. तर नेक्स्ट 500 मध्ये त्या कंपन्या समाविष्ट आहेत ज्या उत्पन्न आणि इतर बाबींच्या बाबतीत टॉप-500 बनण्याच्या मार्गावर आहेत.

महत्वाच्या बातम्या:

नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 हे वर्ष खूपच वाईट, IT क्षेत्राला सर्वाधिक फटका 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts