Cyclone Biparjoy Lanfall Time Location What Will Be Possible Damage Of Cyclone Biporjoy Know Imd Latest Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyclone Biporjoy Update : भारताला बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) धोका आहे. चक्रीवादळ गुजरातच्या (Gujrat) दिशेने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टीवर (Gujrat Costal Area High Alert) अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हवामान विभागाकडून सातत्याने हवामान आणि चक्रीवादळाबाबतची माहिती देण्यात येत आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टीला याचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरातच्या मांडवी, कच्छ तसेच पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. 

बिपरजॉय चक्रीवादळानं धार केलं रौद्र रुप

बिपरजॉय चक्रीवादळाने आता अतितीव्र श्रेणीत रुपांतर केलं आहे. यामुळे याचा धोका वाढला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान जाखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तान किनारपट्टीला ओलांडण्याची शक्यता आहे. या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे.

चक्रीवादळामुळे संभाव्य धोका आणि नुकसानीची शक्यता

  • कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका
  • पक्क्या घरांचेही किरकोळ नुकसान होण्याची शक्यता
  • पुराचा धोका
  • रस्त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं
  • वीज आणि टेलिफोनचे खांब वाकण्याची किंवा पडण्याची शक्यता
  • रेल्वे, ओव्हरहेड पॉवर लाईन आणि सिग्नल सिस्टीमचे किरकोळ नुकसान होण्याचा अंदाज
  • पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं
  • झाडे उन्मळून पडू शकतात

मच्छिमारांना धोक्याचा इशारा

  • मासेमारीवर पूर्ण बंदी
  • समुद्रात असलेल्यां मच्छीमारांना परतीचा इशारा
  • आवश्यक खबरदारी घेण्यासाठी भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील बंदरे
  • नौदल तळावर आवश्यक खबरदारी

किनारी भागात धोक्याचा इशारा

सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी हे जिल्हे चक्रीवादळामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि रस्ते प्रवासात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संभाव्य धोका असलेल्या भागातील लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे.

 

[ad_2]

Related posts