[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कसा बनवाल गुलाबाचा चहा
Ayurvedic Rose Tea Recipe: गुलाबाचा चहा बनविण्याची सोपी रेसिपी डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी दिली आहे.
- १ ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात १ चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्स कराव्या
- अर्धा चमचा किसलेले आलं या पाण्यात मिक्स करून साधारण ५ मिनिट्स हे पाणी उकळवावे
- पाणी उकळल्यानंतर साधे होऊ द्या
- त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिक्स करून हा चहा प्यावा
गुलाबातील घटकांचा परिणाम
गुलाबामध्ये अँटिथसिव्ह आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. शरीरातून कफ काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होत असून गुलाबातील अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सर्दी-खोकला आणि घसादुखी कमी करायला उपयोगी पडते.
(वाचा – या ४ आजार असणाऱ्या व्यक्तींनी चुकूनही नका खाऊ आवळा, अन्यथा हॉस्पिटलमध्येच व्हावे लागेल भरती)
आल्याचा अर्क ठरतो गुणकारी
खोकला आणि सर्दी घालविण्यासाठी आलं हा सर्वाेत्तम मसाला मानला जातो. घशातील खवखव दूर करण्यासाठी नियमितपणे अनेक जण आल्याचा चहादेखील पितात. निसर्गतः उष्ण असणारे आले हे शरीरातील कफ विरघळविण्यास मदत करतात आणि याशिवाय फुफ्फुसात साठलेला कफ काढण्यासही मदत करते.
(वाचा – टॉयलेट सीटवर बसून घाम गाळण्यापेक्षा करा Constipation Problems वर ५ सोपे उपाय, शौच होईल साफ)
प्रतिकारशक्ती वाढवणारे लिंबू
या गुलाबाच्या चहात वापरण्यात येणारे लिंबू हे नैसर्गिकरित्या विटामिन सी ने युक्त असून यामध्ये अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म असतात. शरीरातून कफ काढून टाकण्यास लिंबाची मदत मिळेत आणि घसादुखीपासून त्वरीत सुटका मिळते.
(वाचा – गरम पदार्थाने भाजली जीभ, तर करा सोपे घरगुती उपाय मिळेल ५ मिनिट्समध्ये आराम)
आयुर्वेदातील महत्त्वाचा घटक मध
फुफ्फुसांशी संबंधित सर्व आजारांवर मध हे आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी औषध आहे. नैसर्गिक औषधयुक्त गुणधर्म असणारे मध हे कफावर वरदान समजण्यात येते. त्यामुळे आयुर्वेदिक चूर्णासहदेखील मध मिक्स करून खाण्याचा सल्ला देण्यात येतो. मधाच्या अँटीबॅक्टेरियल तत्वामुळे सर्दी-खोकला दूर पळतो.
कोणत्याही अँटीबायोटिक गोळ्यांशिवाय पावसाळ्यात झालेला सर्दी-खोकला आणि घसादुखी दूर करण्यासाठी तुम्ही हा गुलाबाचा चहा वापरून पाहा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]