Holi 2024 : विशिष्ट देवतेसोबत ‘या’ रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Holi 2024 : होळीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. मथुरा आणि वृंदावनमध्ये होळीची अनोखी परंपरा साजरी करण्यात येते. इथे भगवान कृष्णासोबत आठवडाभर होळीचा सण साजरा करण्यात येतो. इथे रांगासोबत नाही तर फुलांसोबत होळी खेळली जाते. श्रीकृष्णासोबत भक्त फुलांची होळी खेळतात. पूर्वीच्या काळात नैसर्गिक रंगापासून जे रंग फुलं आणि फळांपासून बनले असायचे त्यापासून खेळली जायची. मात्र काळ बदला आणि या रंगाची जागा केमिलयुक्त रंगांनी घेतली. होळीच्या दिवशी रंगांसोबत पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. (Play Holi with your favorite god with these colored flowers Many problems in life will be removed astro tips)

होळीचा हा सण तुमच्या आयुष्यातील संकटांचा दूर करु शकतो. त्यासाठी ज्योतिषशास्त्र पंडीत डॉ. जया मदन यांनी होळीच्या दिवशी उपाय सांगितले आहेत. तुम्ही देखील होळीच्या दिवशी देवदेवतांना त्यांच्या आवडचे फुलं अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होऊ शकते. 

देवांसोबत घ्या होळीचा आनंद!

होळीचा उत्साह हा वाईटावर चांगल्याचा विजय. अशा या होळीचा पारंपारिक पद्धतीने साजरी करायला पाहिजे. होळीचा हा सण तुम्हाला तुमच्या देवाच्या जवळ देण्यास अतिशय शुभ मानला जातो. विशिष्ट देवतेला विशिष्ट रंगाच फुलं अर्पण केल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. देवासोबत फुलांसोबत कधी होळी खेळावी याबद्दल डॉ. जया मदन यांनी सांगितलंय. 

होळी म्हणजे रंग आणि होळी शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर विविध रंगांची फुलं येतात. या फुलांसोबत येतो सुंगध, प्रसन्न आणि चांगल्या एनर्जीची आपल्याला मिळते. जाणून घ्या होळीच्या दिवशी कुठल्या देवतेला कुठलं फुल अर्पण केल्यास आपल्या आयुष्यात आनंद येईल. 

समृद्धी आणि सुखासाठी माता लक्ष्मीला गुलाबी रंगाचं फुलं अर्पण करावं.   
चांगल्या शक्तीसाठी माता दुर्गेला लाल आणि हिरवे फुलं अर्पण करावं. 
विद्येसाठी माता सरस्वतीला पांढरं फुलं अर्पण करावं. 
पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे कॉबिनेशनचं फुलं हे गणरायाला तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अर्पण करावं. 

कृष्ण भगवानाला निळा रंगाचे फुलं अर्पण करुन चांगल्या निर्णय घेण्याची क्षमता द्यावी अशी प्रार्थना करावी.
पिवळं फुलं हे भगवान विष्णूला आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी अर्पण करावे.  
श्री राम आणि हनुमाजी यांनी केशरी रंगाचं फुलं अर्पण करावं ज्यामुळे तुम्हाला यश गाठण्यासाठी शक्ती प्राप्त होते. 
जेव्हा तुम्ही योग्य फुलं योग्य देवतेला अर्पण करता आणि काही वेळानंतर ते कपाळाला किंवा चेहराला स्पर्श करता त्यानंतर तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी रंग आनंद आणि सुख नांदतं. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts