टाळगाव चिखली येथे श्री भैरवनाथ महाराज व हनुमान जयंती उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत व कुस्त्यांचा जंगी आखाडा व लोकनाट्य (तमाशा) चे आयोजन

चिखली :देहू-आळंदी या तिर्थक्षेत्राच्या मध्यभागी असलेले व इंद्रायणी नदीने वेढलेले असे ऐतिहासिक ओळख असलेले टाळगाव चिखली येथील श्री भैरवनाथ महाराज व हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन मोठया उत्सवात करण्यात आले असून चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे होत असून यात्रा उत्सव शनिवार दि. ३० मार्च २०२३ ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये श्री भैरवनाथ ‘महाराज, श्री हनुमान जयंती उत्सव यानिमित्त बैलगाडा, ढोल लेझीम, भजनी भारूड, दांड पट्टा व पैलवान मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती सोहळा व पहाटे १ ते ५ श्री हनुमान रूद्रयाग व अभिषेक, सकाळी ८ ते १० भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक, १० ते १२ देवास, हार, तुरे व पुजा, श्री भैरवनाथ महाराज पुजा व घाटाचे पुजन सायं. ४.३०. भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, खासदार अमोल कोल्हे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस निरीक्षक वसंत बाबर संत तुकाराम स.सा. कारखाना संचालक सुभाष मोरे. बाजीराव श्रीपती मोरे पाटील,पिं.चिं. मनपा वृक्षप्राधिकरण मा. सदस्य आनंदा गणभाऊ यादव, कु. यश दत्ताकाका साने -अध्यक्ष पिं.चि. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना एस. एन. पॉपर्टीज अशोक माने, सुरेंद्र आगरवाल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर हिरानानी घुले, आयुक्त शेखर सिंह,संगीता ताम्हाणे, अश्विनी जाधव, मिनल यादव, सारिका बोऱ्हाडे, पौर्णिमा सोनवणे,मा. नगरसेवक, राहुल जाधव, संजय नेवाळे, कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, एकनाथ पवार, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय नेवाळे माजी नगरसेविका स्विनल म्हेत्रे, संतोष मोरे, दिनेश यादव, मा. नगरसेविका साधनाताई मळेकर, योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे तसेच नगरसेवक पिंपरी- चिंचवड मनपा सन्मानित प्रतिष्ठीत पाहुणे, चिखली विकास सोसायटी चेअनमन- प्रदिप खंडू आहेर, व्हाईस चेअरमन धोंडीबा गोपाळ मोरे, व आजी माजी सरपंच, उपसंरपंच, सदस्य व सर्व सार्वजनिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच सर्व सन्माननिय प्रतिष्ठित पाहुणे मंडळी व समस्त ग्रामस्थ चिखली यांच्या उपस्थितीत होईल.दि. ६ एप्रिल २०२३ पर्यंत दररोज पहाटे ४ ते ७ काकड़ा ६ ते ६.३० ची पुजा, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन, १९ ते २.३० हरिजागरण होणार आहे. गुरूवार दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ श्री भैरवनाथ मंदिर घाट, कुदळवाडी चिखली येथे गावच्या बैलगाडा शर्यतीच्या बैलांची मिरवणूक तसेच रात्री ९ ते १२ ज्योतिबाच्या काठीची मिरवणूक शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ चक्रीभजनाचा कार्यक्रम टाळमंदिर, चिखली येथे होणार आहे.गुरूवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक चिखली येथे होणार आहे. लोकनाट्य (तमाशा) मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा नारायणगावकर मनोरंजनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तसेच शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा, ७ एप्रिल २०२३ दुपारी ३ ते ६ (चिखली हायस्कूल पटागण,पाटीलनगर) येथे होणार आहे. एकूण इमान १०१ पासून १,००,०००/- पर्यत असणार आहे. तसेच परगावच्या बैलगाडा शर्यती शनिवार दिनांक ८/४/२०२३ ते बुधवार दिनांक १२/४/२०२३ एप्रिल स्थळ श्री नागेश्वर विद्यालय शाळेजव पाटीलनगर, चिखली) येथे होणार आहे. ढोल लेझीम स्पर्धेस योग्य तो इनाम दिला जाईल. कार्यक्रमाचा व यात्रा उत्सवाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन भैरवनाथ उत्सव समिती,चिखली व समस्त ग्रामस्थ मंडळी, टाळगाव चिखली यांनी सांगितले आहे

Related posts