Couple Found Dead Inside House In Dehradun; घरात जोडप्याचे मृतदेह, शेजारी ४ दिवसांचं बाळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देहरादून: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या दाम्पत्यानं आत्महत्या करुन जीवनप्रवास संपवला. दोघांचे मृतदेह तीन दिवस घरात पडून होते. त्यांची दुर्गंधी येऊ लागली. पती-पत्नीच्या मृतदेहांच्या मधोमध ४ ते ५ दिवसांचं बाळ झोपलेलं होतं. सुदैवानं बाळ जिवंत होतं. पोलिसांनी बाळाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटना देहरादूनच्या टर्नर रोड परिसरात घडली आहे.ट्रेनर रोडवरील एका घरात मृतदेह असू शकतो. एका घरातून बरीच दुर्गंधी येत आहे, असा फोन देहरादून पोलिसांच्या कंट्रोल रुमला १३ जूनला आहे. यानंतर क्लेमेंट टाऊन पोलीस ठाण्याचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. दुर्गंधी येत असलेलं घर आतून बंद होतं. पोलीस कसेबसे आत शिरले. तेव्हा त्यांना पती, पत्नीचे मृतदेह फरशीवर पडलेले दिसले. दोघांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे मृतदेहांमधून खूप दुर्गंधी येत होती.
बापानं मुलाचे कपडे उतरवले, हात-पाय बांधून रेल्वे ट्रॅकवर बसवले; भरधाव ट्रेन आली अन् मग…
सहारनपूरचा काशिफ त्याची पत्नी अनमसोबत गेल्या ४ महिन्यांपासून टर्नर रोड परिसरात राहत होता. सोहेल नावाच्या व्यक्तीच्या घरात तो भाड्यानं वास्तव्यात होता. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारच्या जखमा सापडलेल्या नाहीत. फरशीवर सांडलेलं रक्त दोघांच्या नाक आणि तोडांतून ओघळलेलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दोन मृतदेहांमध्ये एक लहान बाळ आढळलं. हे बाळ केवळ चार-पाच दिवसांचं आहे. बाळाला लगेचच दून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलाची प्रकृती ठीक आहे. पती, पत्नीनं आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मी तिची इच्छा पूर्ण केली! आईला झोपेच्या ९० गोळ्या देऊन मारणाऱ्या लेकीची धक्कादायक कबुली
काशिफ आणि अनमच्या कुटुबियांनी त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यानंतर कुटुंबीय देहरादूनला पोहोचलं. काशिफ आणि अनमचं लग्न वर्षभरापूर्वीच झालं होतं. काशिफचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला ५ वर्षांचा मुलगा आहे.

[ad_2]

Related posts