Leo April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना घ्यायचा आहे आयुष्यातील अंतिम निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Leo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे सिंह राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Leo April 2024 Horoscope singh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)

सिंह राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा असेल याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. त्या भाकीत केलंय की, या लोकांना एप्रिल महिन्यात आयुष्याबद्दल अंतिम निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी खुल्या मनाने आणि प्रामाणिकपणे तो निर्णय घेऊन पुढे जायचं आहे.  तुमच्या क्षमता आणि स्थितीबद्दल तुम्ही जरा भीतीच्या वातावरणात असणार आहात. तुम्ही एप्रिल महिन्यात असुरक्षित राहणार असून नातेसंबंधाबद्दल खास करुन द्विधा मनस्थितीत असणार आहात. 

तुमच्या प्रिय व्यक्ती किंवा जोडीदाराबद्दल पझेसिव्ह होणार आहात. तुम्ही तुमचे सर्व कर्तव्य पूर्ण करत आहात. त्यामुळे दुसऱ्यांनाही त्यांच्या जबाबदारी पूर्ण करु द्या. काही लोक तुम्हाला गृहित धरु शकता. मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे अस्वस्थ असू शकता. त्यामुळे खोडं व्यवहारी होऊ पुढे जा. 

करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कामात नवीन संधी मिळणार आहे. नवीन नोकरी किंवा प्रमोशन होऊ शकतं. पद आणि जबाबदारी मिळू शकते. तुमची बदलीही होऊ शकते. 

तुमच्या स्वत:चा व्यवसाय असेल तर नफा आणि तोटा असा दोन्ही अनुभव तुम्हाला मिळणार आहे. शिवाय जर तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही चांगली वेळ आहे. पण या महिन्यात तुम्ही थोडे आळशी राहणार आहात. त्यामुळे अॅटीव्ह राहा. आर्थिकदृष्ट्याही हा महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. 

मात्र आरोग्याबद्दल एप्रिल महिन्यात जागृत राहा. तुमच्यासाठी ही एक धोक्याची घंटा असेल. तुमचं वजनही वाढू शकतं. त्यामुळे लाइफस्टाइलवर लक्ष द्या आणि रुटीनमध्ये राहा. 

कोणाच्या तरी बोलण्यामुळे तुम्ही दुखी होणार असून ते वाक्य मनाला लावून घेणार आहात. भावनिकदृष्ट्या तुम्ही ढासळणार आहात. त्यामुळे मनमोकळेपणाने संवाद साधा आणि जी गोष्ट तुम्हाला नाही आवडत ते स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला सांगा. असुरक्षित वाटून नका घेऊ. तुमच्या शेलमधून बाहेर निघा आणि आत्मविश्वाने आयुष्यातील अंतिम निर्णय घ्या. 

सिंह राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये करा हे उपाय !

सिंह राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. लवकर सकाळी उठून अनवाणी पायाने हिरवा गवतावर फिरा. त्यामुळे तुम्हाला जमीनशी जोडून राहता येईल. सूर्यप्रकाशात वावर करा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Related posts