Cyclone Biparjoy Update Imd Heavy Rain 4 Days In Gujarat Rajasthan Delhi Uttar Pradesh Biporjoy Cyclone Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyclone Biparjoy Running Status : बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुजरातला (Gujrat) धडकल्यानंतर आता राजस्थानच्या (Rajasthan) दिशेने पुढे सरकत आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. गुजरातमध्ये बिपरजॉय धडकल्यानंतर मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमधील विध्वंसानंतर चक्रीवादळ राजस्थानकडे पुढे सरकत आहे. या भागातही चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये अधूनमधून पाऊस सुरु आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी रात्री भारताच्या किनारपट्टीवर धडकलं. यामुळे काही लोक जखमी झाले असून घरांसह इतर नुकसान झालं आहे. विजेचे खांब पडून वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

गुजरातला धडकलं बिपरजॉय चक्रीवादळ

बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकलं. किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग सातत्याने कमी होत आहे. पण, धोका मात्र टळलेला नाही. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने

बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हजारो लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात तसेच शेजारील महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

गुजरातमधील अनेक जिल्हे बिपरजॉयमुळे प्रभावित

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रातून उंच लाटा उसळत आहेत. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी 15 टीम एअरलिफ्टसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.  



[ad_2]

Related posts