Cyclone Biparjoy Photos From Space Uae Astronaut Sultan Al Neyadi Captured Biparjoy Cyclone From International Space Station

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर (Gujrat Coast) धडकलं. बिपरजॉयमुळे झालेला परिणाम पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) 18 जूनपर्यंत 99 गाड्या रद्द केल्या आहेत. गुजरात (Gujrat) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कायम

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकलं. त्यानंतर आता चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर त्यातील वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे, मात्र चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने या भागातील ट्रेन रद्द केल्या आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 99 ट्रेन रद्द

बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस आणखी काही गाड्या रद्द करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली होती. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण 99 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय तीन गाड्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत. इतर सात गाड्या त्यांच्या निश्चित स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून चालवल्या जाणार आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर 

पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 39 गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानकापूर्वी थांबवण्यात येतील. बिपरजॉयमुळे गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. दुसरीकडे, कच्छ जिल्ह्यात चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आणि समुद्रालगतच्या सखल भागात पूर आला.

बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये 22 जण जखमी

चक्रीवादळामुळे गुजरामध्ये मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत 22 लोक जखमी झाले आहेत. तर, 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 74 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नुकसान झालेल्या भागात NDRF चं मदतकार्य सुरु आहे.524 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे 940 गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

[ad_2]

Related posts