Multibagger Stock Infrastructure and Real Estate Company Hazoor Multi Projects Limited Share turn 1 lakh rupees in to rs 3 crore in just five years Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Multibagger Stock Hazoor Multi Project Share : मुंबई : अनेकजण शेअर मार्केटमध्ये (Share Market)  गुंतवणूक करणं टाळतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं तसं जोखमीचं म्हटलं जातं. पण योग्य सल्ला आणि अभ्यास करुन जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर मात्र इथून बक्कळ नफा मिळवता येतो. अनेकदा तज्ज्ञ शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

शेअर मार्केटमध्ये कधी एखादा शेअर फार अल्पावधीत उंच भरारी घेतो, तर कधी एखादा शेअर फार काळ तळालाच राहतो. पण कधी कधी एखादाच शेअर मल्टीबॅगर (Multibagger Return)  ठरतो आणि नशीब उजळवतो. यातील अनेक शेअर्स दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देतात, तर काही शेअर्स गुंतवणूकदारांना अल्प कालावधीत श्रीमंत करतात. असाच एक शेअर म्हणजे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर. 

इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड (Hazoor Multi Projects Share) चे शेअर्स देखील यापैकी एक आहेत. ज्यामध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार अवघ्या 5 वर्षांत कोट्याधीश झाले आहेत. या शेअरकडून अजिबात अपेक्षा नसतानाही, यानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. 

पाच वर्षांपूर्वी एक लाख गुंतवले, आता 3.5 कोटी रुपये मिळाले 

सध्या सरकार इंफ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. अशातच या क्षेत्राशी निगडीत कंपन्या भरभराटीला येत असून त्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही श्रीमंत होत आहेत. यामुळेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरनं केवळ पाच वर्षांत एवढी जोरदार कामगिरी केली आहे. 

एप्रिल 2019 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते, आता त्याच एक लाखांची किंमत दोन, तीन लाख नाहीतर तब्बल 3.5 कोटी रुपये झाली आहे. थोडं मागे जाऊन पाहिलं तर, 12 एप्रिल 2019 रोजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत फक्त 1.13 रुपये होती. पण त्याच शेअरची किंमत काल म्हणजे, 9 मार्च रोजी (मंगळवार) बाजार बंद झाल्यावर 405.05 रुपयांवर पोहोचली. त्यानुसार, 5 वर्षांच्या कालावधीत शेअरनं गुंतवणूकदारांना 35,745.13 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

9 एप्रिल 2024 (मंगळवारी) रोजी शेअर बाजार बंद झाला तेव्हा हजूर मल्टी प्रोजेक्ट शेअर 4.99 टक्के वरच्या सर्किटसह बंद झाला. हा साठा गेल्या सात दिवसांपासून अपर सर्किटमध्ये आहे. नवं आर्थिक वर्ष FY25 च्या सुरुवातीसह, अप्पर सर्किटची (Upper Circuit) स्थापना सुरू झाली आणि ती मंगळवारपर्यंत सुरू राहिली. या कालावधीत, या 7 दिवसांत स्टॉकमध्ये सुमारे 40 टक्क्यांची वाढ झाली. 28 मार्च रोजी त्याची किंमत 288 रुपये होती.

हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या स्टॉकची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहिली तर अल्पावधीतच हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक असल्याचं सिद्ध झालं आहे. 755.82 कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 223.39 टक्के परतावा मिळाला आहे. म्हणजेच, सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचा पैसा तिपटीनं वाढला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीनं 321 टक्क्यांचा बक्कळ परतावा दिला आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts