Most Demanding Jobs Recruitment Trends and Skills;सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 10 नोकऱ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Most Demanding Jobs : सध्या सर्वच क्षेत्रात नोकरी मिळविण्याची जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात कामाचे जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपुर्वी आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या त्या क्षेत्राला आता फारशी मागणी राहीली नाही. नवीन तंत्रज्ञानाने नोकरदारांच्या महत्वावर परिणाम झाला. काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत. 

सॉफ्टवेअर इंजिनीअर

सॉफ्टवेअर इंजिनीअर हे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्ट करतात. या क्षेत्रात तुम्ही जाऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे मजबूत प्रोग्रामिंग स्किल, सोबतच किचकट समस्यांना सोडविण्याची क्षमता असणे गरजेचेआहे.

डेटा सायंटिस्ट

डेटा सायंटिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करतात, त्याचे विश्लेषण करतात आणि त्याचा अर्थ लावतात. व्यवसाय ऑपरेशन्समध्ये सुधार करण्यासाठी, त्याचा अंदाज आणि शिफारसी करण्यासाठी ते या डेटाचा वापर करतात.

हेल्थकेअर प्रोफेशनल्स

हेल्थकेअर प्रोफेशनल्स हे रुग्णांची काळजी घेतात. त्यांच्याकडे मानवी शरीराची मजबूत समज आणि रोगांचे निदान आणि उपचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

शिक्षक

बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची इच्छा असेल तर या नोकरीकडे वळू शकता. यासाठी तुमच्याकडे संबंधित विषयाची मजबूत समज आणि विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यकआहे.

फायनान्शियल अॅनालिस्ट

फायनान्शियल अॅनालिस्ट म्हणजेच आर्थिक विश्लेषक हे संस्थांच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करतात. त्यांच्याकडे मजबूत विश्लेषणात्मक कौशल्ये आणि योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असणे महत्वाचे ठरते.

मार्केटिंग मॅनेजर

मार्केटिंग मॅनेजर हे मार्केट प्लानिंग आणि अंमलबजावणीचे काम करतात. त्यांना टार्गेट ऑडियन्सची अधिक समज असणे अपेक्षित आहे. तसेच प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असणे गरजेचे आहे.

बिझनेस अॅनालिस्ट 

बिझनेस अॅनालिस्ट म्हणजेच व्यवसाय विश्लेषक हे व्यवसायातील त्यांचे कार्य सुधारण्यात मदत करण्यासाठी माहिती गोळा करतात आणि त्यांचे विश्लेषण करतात.  बिझनेस अॅनालिस्टकडे समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि व्यावसायिक नेत्यांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. 

प्रोजेक्ट मॅनेजर

प्रोजेक्ट मॅनेजर हे प्रकल्पांची योजना, अंमलबजावणी आणि देखरेख करतात. त्यांच्याकडे मजबूत संघटनात्मक कौशल्ये आणि विविध प्रकारच्या लोकांसह कार्य करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह

सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हे ग्राहकांना आणि व्यवसायांना उत्पादने आणि सेवा विकतात. त्यांच्याकडे मजबूत संभाषण कौशल्य आणि ग्राहकांशी संबंध निर्माण करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

Related posts