[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे. इथे लोक स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. लाइक्स आणि व्ह्यूजचं लोकांना असं काही वेड लागलं आहे की यासाठी ते जीवाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. असे बरेच लोक आहेत जे आपल्या जीवाची पर्वा देखील करत नाहीत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.मंडळी, आग ही काही खेळायची गोष्ट नाही. चुकून आगीच्या तडाख्यात आलात तर समजा तुमचं काही खरं नाही. पण लोकांना हे कोण समजवणार. सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये दिसणारे स्टंट लोक वास्तव समजून करायला जातात. आता ही क्लिप पहा जिथे लोक आगीवर उडी मारून मजा करत आहेत. पण यादरम्यान तरुणाकडून अशी चूक होते आणि ही मजा त्यांच्यासाठी शिक्षा बनते.
पाहा हा व्हिडिओ….
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एखाद्या हिल स्टेशनचा असल्याचं दिसत आहे. जिथे अनेक लोक बॉनफायरची मजा घेत आहेत. बरेच लोक मागे बसून हुल्लडबाजी करत असताना काही तरुण आगीवर उड्या मारून स्टंटबाजी करत आहेत. अशात, एका तरुणाने आगीवर उडी मारून जाण्याचं ठरवलं. त्याने आगीवर उडी घेताच त्याचवेळी एक व्यक्ती त्याच्यावर आदळतो आणि दोघेही एकमेकांवर आदळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात.
हा व्हिडिओ ट्विटर @cctvidiots वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला असून यावर एका युजरने लिहिले की, याला म्हणतात बैल किल मी. तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा एक प्राणघातक स्टंट आहे.’ तर आणखी एकाने लिहले की, ‘कोण अशा प्रकारे आगीशी खेळतं.’
[ad_2]