Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 17th June 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा कच्छ आणि सौराष्ट्रात तडाखा, एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडीत 

Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळं (Cyclone Biparjoy) गुजरातमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं कच्छ आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळं 23 जण जखमी झाले आहेत. तर राज्यातील किमान एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वाचा सविस्तर…

Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पाऊस, उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

India Weather Update : देशातील काही भागात पावसाच्या सरी पडत आहेत, तर काही भागात उन्हामुळे अंगाची लाही-लाही होताना पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील बहुतांश भागात पावसामुळे आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर…

Wrestlers Protest : ‘सुनो द्रौपदी…’, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विनेश फोगटने शेअर केली कविता

Wrestlers Protest Against Brij Bhushan Singh : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या नंतर कुस्तीपटू विनेश फोगटने एक कविता शेअर केली आहे. विनेश फोगटने तिच्या अधिकृ ट्विटर अकाऊंटवरून कवितेचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. या शेअर केलेल्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे- ‘सुनौ द्रौपदी शस्त्र उठा, अब गोविंद ना आएंगे, छोड़ो मेहंदी खड़ग संभालो, खुद ही अपना चीर बचालो…’ वाचा सविस्तर…

Jammu Kashmir : पाकिस्तानचा कट उधळला! 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir Terrorist Encounter : भारतीय लष्कराला (Indian Army) मोठं यश मिळालं आहे. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचा (Pakistan) कट उधळून लावत पाच दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत त्यांना कंठस्नान घातलं आहे. या महिन्यात काश्मीर खोऱ्यात घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता. वाचा सविस्तर…

Odisha Train Accident : मृतांची संख्या वाढली, बिहारमधील 17 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Odisha Train Accident : ओडिशातील  बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (16 जून) उपचारादरम्यान बिहारमधील (Bihar) एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृतांचा आकडा 290 झाला आहे. या अपघातात एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. वाचा सविस्तर…

17th June In History : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली, जपानने चीनविरोधात युद्ध पुकारलं; आज इतिहासात

भारतीय इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाची असलेली सविनय कायदेभंग चळवळ आजच्याच दिवशी मागे घेण्यात आली. ताजमहल जिच्या स्मरणार्थ बांधला आहे त्या मुमताज महलचं आजच्या दिवशी निधन झालं. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर…

Horoscope Today 17 June 2023 : आज ‘या’ राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 17 June 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीचे लोक जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कसा असेल शनिवारचा दिवस मेष ते मीन, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर…

[ad_2]

Related posts