Abp C Voter Survey Asked Question Can Lok Sabha Election Will Held Earlier Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP C-Voter Survey:  लोकसभा 2024 (Loksabha Election 2024) च्या निवडणुकांसाठी अगदी वर्षभराचाच कालावधी उरला आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. 

दरम्यान भाजपला केंद्रात नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकांशी जोडण्यासाठी वेगवेगळ्या मोहिम राबवण्यात येत आहेत. भाजपच्या प्रचाराचा भाग म्हणून अनेक जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जाहीर सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी भाजपाने आपली कंबर कसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

दुसरीकडे देखील विरोधकांकडून देखील एकजूटीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नव्या संसदेच्या सोहळ्याला अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रितपणे बहिष्कार टाकला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला देखील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्येही विरोधकांची एकजूट दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी पाटनामध्ये विरोधकांची बैठक बोलवाली आहे. नुकतच नितीश कुमार यांनी लोकसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. 

सध्याच्या राजकीय वातावरणात साप्ताहिक सर्वेक्षण

सध्या सुरु असलेल्या राजकीय वातावरणात एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने सर्वेक्षण केले आहे. लोकसभा निवडणुका लवकर होणार का हा सवाल या वेळेल लोकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नांवर उत्तर देतांना लोकांनी आश्चर्यकारक उत्तरं दिली आहेत. या सर्वेक्षणातून असं निदर्शनास आलं की, अनेक लोकांना असं वाटतयं लोकसभा निवडणुका या लवकर होणार आहेत. 

All India Survey: तुम्हाला असं वाटतं का लोकसभेच्या निवडणुका लवकर होतील? 
हो – 33 टक्के 
नाही – 55 टक्के 
माहित नाही – 12 टक्के 

या सर्वेक्षणात 33 टक्के लोकांना वाटतयं की लोकसभेच्या निवडणुका या लवकर होणार आहेत. तर 55 टक्के लोकांनी या निवडणुका लवकर होणार नाही असं म्हटलं आहे. जवळपास 12 टक्के लोकांना या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता आले नाही. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुका लवकर होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

(टीप: एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने हे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री

[ad_2]

Related posts