Rahul Gandhi Said About Central Government Employment Attack On Central Government Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi On Employment: सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगाराच्या संधीच्या मुद्द्यावरुन ट्विट केले  आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगारावरुन केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. 

 ‘सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार हा भारतात अभिमान असायचा आणि रोजगारासाठी प्रत्येक तरुणाचे स्वप्न असायचे. पण, आज सरकारचे प्राधान्य या गोष्टी नाहीत. देशातील सार्वजनिक उपक्रमांमधील रोजगार 2014 मध्ये 16.9 लाखांवरून 2022 मध्ये केवळ 14.6 लाखांवर आला आहे. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी होतात का?’ असा सवाल देखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

  ‘BSNL मध्ये 1,81,127 नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तर SAIL मध्ये 61,928, MTNL मध्ये 34,997, SECL मध्ये 29,140, ​​FCI मध्ये 28,063, ONGC मध्ये 21,120 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांची खोटी आश्वासने देणाऱ्यांनी नोकऱ्या वाढवण्याऐवजी दोन लाखांहून अधिक नोकरदारांना काढून टाकले आहे’, असा आरोपही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

मणिपूर हिंसाचारावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

याआधी राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, भाजपाच्या द्वेषाच्या राजकाराणामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे. या हिंसाचारामध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी देशाला अपयशी ठरवले असून आता ते यावर मौन बाळगून आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे’ पुढे लिहितांना राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, ‘मणिपूरमध्ये द्वेषाचे दुकान बंद करुन, प्रेमाचे दुकान सुरु करुया.’ 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 



[ad_2]

Related posts