( प्रगत भारत । pragatbharat.com)
Budh Asta 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा आज बुध राशीत अस्त झाला आहे. 7 जूनला बुध वृषभ राशीत गोचर केलं होतं. बुध ग्रहाच्या अस्त होण्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. पण काही राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे त्याची ऊर्जा कमी होते, न्यूरोलॉजिक समस्या आणि आरोग्याची समस्या तुम्हाला जाणवू लागते. कुठल्या राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे. तुमची रास तर यात नाही ना जाणून घ्या.
बुधाचा अस्तकाळ ‘या’ राशींच्या अडचणी वाढवणार! (mercury combust in taurus budh ast 2023 june 19 negative impact on these zodiac signs career and financial)
वृश्चिक (Scorpio)
बुध अस्तामुळे या राशींवर वाईट परिणाम दिसून येणार आहे. तुम्हाला सारखं आपण एकट आणि असुरक्षित असल्याचं जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताण वाढणार आहे. निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कितीही चांगलं कामं केलं तरी त्याकडे लोक दुर्लक्ष करतील. कोणाचंही सहकार्य या काळात लाभणार नाही.
कन्या (Virgo)
कन्या राशीची स्वामी बुध असल्यामुळे या राशीला सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. या लोकांना कितीही मेहनत केली तरी नशिबाची साथ मिळणार नाही आहे. आर्थिक बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आरोग्यामुळे तुम्ही त्रस्त असणार आहात.
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांना बुध अस्तकाळा अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. बँक बँलेन्स ढासळणार आहे. घरातही वातावरण चांगलं नसणार. खर्चात अचानक वाढ होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्यांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांना आर्थिक संकटासोबतच लव्ह लाइफमध्येही समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. जोडीदारासोबत वाद विवाद आणि मतभेदामुळे नात्यामध्ये तणाव असणार आहे. वाजवीपेक्षा जास्त खर्च होणार आहे. करिअरमध्ये आर्थिक संकटासोबत उतार काळ सुरु होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांना खर्चांवर खूप नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कर्जबाजारीपणा येण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ न मिळाल्यामुळे होणारी कामंही रखडणार आहेत. नवीन योजना, करार विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. आर्थिक स्थिती या दिवसांमध्ये खराब होण्याची शक्यता आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )