Summer Vacation Extended In These States This Is The Reason Up Bihar Jharkhand Mp Schools Closed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Summer Vacation Extended Again: पारा वाढत असल्याने नागरिकांच्या अडचणीही वाढत आहेत. तापमानाचा पारा (Heatwave) झपाट्याने वाढत असल्याने मुलांच्या शाळा सुरू करण्याची तारीख पुन्हा पुन्हा पुढे ढकलली जात आहे. यूपीपासून मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. प्रचंड उष्णतेमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाढवण्यात (School Summer Vacation Extended) आल्या आहेत. हवामान असेच राहिल्यास शाळांची सुट्टी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मध्य प्रदेशातील शाळांची सुट्टी वाढवली

मध्य प्रदेशातील प्राथमिक वर्गांसाठीच्या शाळा 1 जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होतील, पण त्यांच्या वेळेत बदल केला जाईल. उष्णतेच्या लाटेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम मध्य प्रदेशातील सर्व शाळांना लागू आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या शाळा 20 जूनपासून सुरू होतील, पण त्या अर्ध्या दिवसाच्या पद्धतीने सुरू केल्या जातील.

झारखंडमध्ये शाळा पुन्हा बंद

उष्णतेमुळे झारखंडमधील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. झारखंडमधील शाळांची सुट्टी वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. आठवीपर्यंतच्या शाळा 21 जूनपर्यंत बंद राहतील. तर नववी ते बारावीची वेळ बदलून सकाळी 7 ते 11 करण्यात आली आहे. यापूर्वी 11 आणि 14 जूनलाही शाळांची सुट्टी वाढवण्यात आली होती.

यूपीमध्ये 26 तारखेपर्यंत शाळा बंद

यूपी अर्थात उत्तर प्रदेशातील शाळा 26 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सूचना जारी केल्या होत्या. येथील शाळा 15 जूनपासून सुरू होणार होत्या, त्या आता 26 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा आदेश उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांसाठी लागू होता.

छत्तीसगडमध्येही शाळा बंद

छत्तीसगडमधील शाळाही 26 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील शाळाही 24 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाटणाचा हा आदेश 19 जूनपासून लागू होणार असून 24 जूनपर्यंत राहील.

तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे शाळा बंद

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत, याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. चेन्नई व्यतिरिक्त रानीपेट, कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेंगलपेट आणि वेल्लोर येथील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Heatwave in India: यूपी-बिहारमध्ये जीवघेणी उष्णता; तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts