Nandan Nilekani Profile Infosys Co Founder Aadhaar Architect Donated Ss 315 Crore To Iit Bombay Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who Is Nandan Nilekani: इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलकेणी यांनी मुंबई आयआयटीला 315 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्या आधीही त्यांनी या संस्थेला 85 कोटी रुपये दिल्याने हा निधी 400 कोटीवर पोहोचला आहे. या दातृत्वानंतर नंदन नीलकेणी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या देशातील लोकांना ओळख देण्यासाठी ज्या आधारची निर्मिती करण्यात आली त्याची संकल्पना ही नंदन नीलकेणी यांचीच. तसेच त्यांनी 2014 साली बंगळुरुमधून लोकसभेची निवडणुकही लढवली होती. 

Nandan Nilekani Profile: मुंबईमध्ये करिअरची सुरुवात 

नंदन नीलकेणी (Who Is Nandan Nilekani)  यांनी आपल्या करिअरची सुरवात मुंबईतून केली आहे. ते मुंबई आयआयटीचे विद्यार्थी आहेत. 1978 साली त्यांनी मुंबईत पटनी कॉम्युटर सिस्टममधून कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1981 साली ज्या सात अभियंत्यांनी इन्फोसिसची स्थापना केली त्यापैकी एक म्हणजे नंदन नीलकेणी होय. या कंपनीत त्यांनी अनेक पदं भूषवली. त्यामध्ये सीईओ, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदांवर त्यांनी काम केलं. 2002 ते 2007 या काळात त्यांनी इन्फोसिसचे सीईओ म्हणून काम केलं. 

Aadhaar UIDAI and Nandan Nilekani: ‘आधार’साठी इन्फोसिस सोडलं..

भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख देण्यासाठी आधारचा कार्यक्रम सुरू केला. आधार निर्मितीचं काम हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (Unique Identification Authority of India UIDAI) माध्यमातून करण्यात येणार होतं. याच्या प्रमुखपदी नंदन नीलकेणी यांची निवड करण्यात आली. त्यासाठी नीलकेणी यांनी 2009 साली इन्फोसिस सोडलं आणि आधारसाठी स्वतःला झोकून दिलं. 

Nandan Nilekani Political Career : नंदन नीलेकणी यांची राजकीय कारकीर्द

दक्षिण बंगळुरु मतदारसंघातून 2014 सालची 16 वी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलकेणी यांनी मार्च 2014 मध्ये आधारच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळचे ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार होते, त्यांची चर्चाही मोठी झाली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र ते राजकारणात कधी सक्रिय असल्याचं दिसून आलं नाही. त्यांनी पुन्हा आपलं लक्ष व्यापारामध्ये घातलं. निलेकणी यांनी भारताच्या नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) तसेच The IndUS Entrepreneurs (TiE) च्या बेंगळुरू अध्यायाची सह-स्थापना केली. त्यांनी आघाडीच्या UIDAI (आधार) साठी 2014 मध्ये इकॉनॉमिस्ट सोशल अँड इकॉनॉमिक इनोव्हेशन अवॉर्ड देखील जिंकला.

नंदन नीलकेणी हे एक उत्तम गुंतवणूकदार आहेत. नीलकेणी यांनी ऑटोमोटिव्ह, माहिती सेवा, लॉजिस्टिक, इलेक्ट्रिकल उपकरणे, माहिती सेवा यासारख्या क्षेत्रांसह डझनभर स्टार्टअप उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्टार्ट-अप व्हेंचर कॅपिटल फर्म फंडामेंटल पार्टनरशिपही सुरू केली.

Nandan Nilekani Connection With IIT Bombay : नंदन नीलकेणी यांचे आयआयटी बॉम्बे कनेक्शन 

नंदन नीलेकणी यांनी 1973 मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. नीलेकणी यांनी गेल्या 50 वर्षांपासून संस्थेशी विविध गोष्टींमध्ये सहभाग घेतला आहे. ते 2005 ते 2011 पर्यंत प्रशासक मंडळावर आणि 1999 ते 2009 पर्यंत IIT बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशनवर होते. त्यांना 1999 मध्ये Distinguished Alumnus Award मिळाला आणि त्यानंतर 2019 मध्ये IIT बॉम्बेच्या 57 व्या दीक्षांत समारंभाचा भाग म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. 

Nandan Nilekani Family : नंदन नीलकेणी यांचे कुटुंब

नंदन मोहनराव नीलकेणी यांचा जन्म 2 जून 1955 रोजी आई-वडील दुर्गा आणि मोहनराव नीलकेणी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील म्हैसूर आणि मिनर्व्हा मिल्सचे महाव्यवस्थापक होते. नीलकेणी यांनी बिशप कॉटन बॉईज स्कूल आणि सेंट जोसेफ हायस्कूल धारवाड, कर्नाटक पीयू कॉलेज धारवाड येथे शिक्षण घेतले.

नीलेकणी यांनी रोहिणी नीलकेणी (पूर्वाश्रमीच्या सोमण) यांच्याशी लग्न केले, त्यांची आयआयटी क्विझ कार्यक्रमात भेट झाली होती. निहार आणि जान्हवी ही त्यांची दोन मुले आहेत, दोघांनी येल विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

Nandan Nilekani Property: नंदन नीलकेणी यांची संपत्ती किती? 

फोर्ब्सच्या रीअलटाइम अब्जाधीश निर्देशांकाच्या आकड्यांनुसार, नंदन नीलकेणी यांची वास्तविक संपत्ती 213 अब्ज रुपये इतकी आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. 

ही बातमी वाचा:

[ad_2]

Related posts