Crime News Today Young Man Murder Sister In Law And Commit Suicide In Bihar; दार आतून बंद, वहिनीचा गळा चिरुन दिराची आत्महत्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पाटणा: दिराने आधी आपल्या वहिनीची हत्या केली आणि नंतर त्याने आत्महत्या केली. दिराने वहिनीला गळा कापून मारलं त्यानंतर त्याने स्वत:चा देखील गळा कापला आणि आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर भागलपूर रिसर्च सेंटरची एसएफएल टीम सहरसा सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एफएसएल टीमने घटनास्थळी पोहोचून सुमारे दोन तास तपास केला.

यावेळी तपासादरम्यान मृत महिलेच्या शिक्षक पतीचीही चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, धारदार शस्त्र, हत्येसाठी वापरलेला चाकू हा दुसऱ्या खोलीतून जप्त करण्यात आला असून इतर अनेक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. ज्याचा तपास एसएफएल टीम करत आहे.

साडेआठ कोटींची चोरी करुन देवदर्शनाला निघाली, पण १० रुपयांच्या फ्रूटीचं आमिष अन् खेळ खल्लास
मृत जयमाला देवी यांचे पती आणि मृत चंदनचे मोठे भाऊ यांच्या म्हणण्यानुसार, बाजूच्या घरातून माझ्या पत्नीवर लहान भावाने चाकूने वार केल्याचा फोन आला. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा पाहिले की पत्नी आणि माझा भाऊ जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि खोलीचं दार आतून बंद होते. त्यानंतर ते भिंतीवर चढले आणि त्यांनी खोलीत प्रवेश केला. त्यांनी तात्काळ पत्नीला आणि भावाला रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

ही घटना धाकट्या भावानेच घडवून आणली असून त्याने स्वतःही गळा चिरून आत्महत्या केल्याचे मृत महिलेच्या पतीने सांगितले. खाण्यापिण्याबाबत उशीर झाल्याने हा वाद झाला असल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी भाऊ आणि पत्नी व्यतिरिक्त घरात कोणीही नव्हते, असेही सांगण्यात येत आहे. या संदर्भात भागलपूर संशोधन केंद्रातून आयएसएफएल टीमला अनेक पुरावे मिळाले आहेत, त्यानुसार तपास केला जात आहे. चौकशीनंतरच याप्रकरणी कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

या प्रकणाने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. जर दिराने वहिनीची हत्या करुन आत्महत्या केली, तर त्याने वापरलेलं शस्त्र दुसऱ्या खोलीत कसं पोहोचलं. कारण हे दोघंही एकाच खोलीत मृत आढळले, तर खोलीचं दारही आतून बंद होतं. सध्या पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Man Became Millionaire: ३८ कोटी जिंकले, पण विजेत्याचा कुठेही पत्ता नाही, अख्खा देश शोधतोय ‘लकी मॅन’ला

[ad_2]

Related posts