( प्रगत भारत । pragatbharat.com)
Titanic Submarine: टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. मात्र, त्यातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडीचं काम पाहणाऱ्या ओशन गेट या कंपनीनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. 22 जून रोजी ओशन गेट कंपनीने एक पत्रक जाहिर केलं असून त्यानुसार पाणबुडीत असलेले पाचही प्रवाशांच्या जिवंत असल्याची आशा मालवली आहे, असं नमूद केलं आहेत. तसंच, कंपनीने श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.
अमेरिकी तटरक्षक दलाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. एका रिमोट ऑपरेटेड व्हेईकल आरओवीला टायटॅनिकचे अवशेष असलेल्या परिसरात मलबा आढळून आला आहे. हा मलबा कसा आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेनंतर सध्या सोशल मीडियावर अजब दावा केला जात आहे. या अपघाताची भविष्यवाणी 16 वर्षांपूर्वीच झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. एका अॅनिमेटेड टीव्ही शोमधील हा व्हिडिओ असून 2006 मध्ये हा टीव्हीवर प्रदर्शित झाला होता. 8 जानेवारी 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये टीव्ही शोमधील नायकासोबत अशाच प्रकारची दुर्घटना घडताना दाखवले आहे. 17 वर्षांपूर्वीच या अपघाताची भविष्यवाणी झाली असल्याचा दावा काहींनी केला आहे.
17व्या एपिसोडचं शिर्षक होमर्स पॅटर्निटी कुट असं होतं. यामध्ये हॅमर सिम्पसनचे वडील मॅसन फेअरबॉक्स आपल्या मुलासोबत समुद्रात जात असतात. त्यावेळी ते मुलाला काही गोष्टी सांगत असतात. आज मी माझ्या मुलासोबत समुद्रात खजिना शोधायला जात आहे. मी आज खूप आनंदात आहे. मला जो आज आनंद होत आहे तोच आनंद तुम्हालाही मिळो, असं माझं स्वप्न आहे, असं ते म्हणत आहेत. त्यानंतर समुद्राच्या तळाशी जातात.
समुद्राच्या तळाशी जात असताना थोडीशी शोधाशोध केल्यानंतर दोघांनाही खजिन्यानी भरलेले जहाज सापडते. त्यांची पाणबुडी खजिन्याकडे जात असतानाच त्यातील ऑक्सिजन संपतो आणि सिम्पसनची पाणबुडी एका दगडात अडकते आणि ऑक्सिजन कमी होऊ लागतो. त्यामुळं सिम्पसन ओरडू लागतो.
मात्र, या एपिसोडचा शेवट चांगला दाखवला आहे. तीन दिवसांनंतर सिम्पसन शुद्धीवर येतो आणि पाहतो की त्याच्या आजूबाजूला त्याचा सगळा परिवार आहे. या कार्टुनमध्ये दाखवलेल्या पिता-पुत्रांची तुलना पाणबुडीत सहभागी असलेल्या शहजादा दावूद आणि त्यांचा मुलगा सुलेमान याच्याशी केली जात आहे.
Episode released January 8, 2006 ain’t no way the Simpsons predicted the #titanicsubmarine #OceanGate #Simpsons #OceanGateExpeditions #Titan #Titanic pic.twitter.com/yT0iyEgPP5
— Mury (@PILOTB767) June 22, 2023
कार्टुन सीरीजमधील एक भाग सध्या ट्विटरवर जोरदार शेअर केला जात आहे. काहि लोकांच्या म्हणण्यानुसार, सिम्पसन सतत काहींना काही भविष्यवाणी करत असतो. अमेरिकेवर झालेला ९/११ हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक यासारख्या काही घटना आधीच एपिसोडमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.