One World Trade Center Building New York Lit Up Tricolour Welcome PM Modi Know All Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi US Visit:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (World Trade Centre) तिरंग्यांची रोषणाई केली आहे. न्यूयॉर्कमधील भारतातील वाणिज्य दूतावासने ट्विट करत या रोषणाईचे फोटो शेअर केले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इम्पिरिअल स्टेट या इमारतीवर देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी ते अमेरिकेतील भारतीयांच्या कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील आगमनानंतर त्यांना अमेरिकेतील सैन्याकडून  गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आलं. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसवर स्वागत देखील केले. तर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील घेण्यात आली. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

गुरुवारी (22 जून) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसवर भाषण देखील केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे.’ तसेच त्यांनी भारत आणि अमेरिकेमधील अनेक सकारात्मक भूमिकांविषयी देखील भाष्य केलं. दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त अंतराळ मोहीमांविषयी देखील घोषणा करण्यात आली. 

द्विपक्षीय बैठक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारत आणि अमेरिकेचे संबंध हे जगासाठी फार महत्त्वाचे आहेत.’ तसेच पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘आजच्या चर्चेमध्ये घेण्यात आलेले निर्णय हे आमच्या जागतिक धोरणात्मक संबधांच्या महत्त्वपूर्ण अध्यायाशी जोडले गेले आहेत.’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अमेरिकेच्या संसदेत देखील भाषण केलं. यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं की, ‘मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो, तेव्हा भारत जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.’ पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आम्ही त्या दिशेनं वेगानं पावलं टाकत आहोत. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हा संपूर्ण जगाचीही प्रगती होत असते.’ तसेच त्यांनी त्यांच्या संसदेच्या भाषणात चीनला देखील चांगलेच ठणकावले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर आज मायदेशी परतणार आहेत. दरम्यान पंतप्रधानांचा हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

PM Modi US Visit: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं



[ad_2]

Related posts