Shocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Titanic Missing Submarine Titan : सर्वाधिक ऑस्कर जिंकणाऱ्या आणि 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या Titanic या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या OceanGate कंपनीच्या पाणबुडी दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. 

काही दिवसांपूर्वी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रतळशी गेलेल्या टायटन पाणबुडीला अपघात होऊन Catastropic Implosion मुळं त्यातून प्रवास करणारे पाचही प्रवासी जीवाला मुकले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर अनेक तथ्य आणि अनेक निरीक्षणं नोंदवण्यात आली. ज्यामधून ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीत असणाऱ्या त्रुटी उघडपणे मांडल्या गेल्या आणि कोट्यवधींच्या रकमेत अनेकांच्याच जीवाशी सुरु असणारा खेळ पाहून खुद्द ‘टायटॅनिक’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांचाही संताप झाला. 

काय म्हणाले कॅमरुन? 

ज्या क्षणी आपल्या कानांवर पाणबुडीशी संपर्क तुटल्याची माहिती आली त्याच क्षणी ती नाहीशी झाल्याच्या जाणीवेनं रक्त गोठलं, असं ते एका प्रतिष्ठित माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. रविवारी टायटॅनिक पाहण्यासाठी निघालेल्या पाणबुडीबाबत कॅमरुन यांना सोमवारी माहिती मिळाली, ज्यानंतर त्यांनी हे अतिश. क्रूरकृत्य असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली. 

पुढील काही दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांनी या पाणबुडीत 96 तास पुरेल एवढा ऑक्सिजन होता यावर लक्ष्य केंद्रीत केलं. त्या आदळण्याच्या मोठ्या आवाजाकडे लक्ष वेधलं. पण खरं तर हे सारं एखाद्या भयंकर स्वप्नासारखं आहे. हे एक असं स्वप्न आहे जे दिर्घकाळ काळजावर घाव करत राहणारं आहे असंही ते म्हणाले. 
 

टायटॅनिकप्रमाणंच आता टायटनचे अवशेषही तिथंच असल्याचा दुर्दैवी योगायोग अधोरेखित करत त्यांनी ओशनगेट कंपनीला सदरील संकटाची चाहूल देणारे अनेक प्रसंग यापूर्वी घडून गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्रात खोलवर जाऊन संशोधन करणाऱ्यांपैकी अनेकांनीच सुरक्षिततेच्या मुद्द्याला हात घालत तुम्ही catastrophe च्या वाटेनं जात असल्याचा गंभीर इशारा दिल्याचं सांगितलं. 

आपण अवतार चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान असतानाच काही जाणकारांनी ओशनगेट कंपनीला सुरक्षेच्या निकषांवरून सतर्क केल्याचं सांगत, ‘तुम्ही ज्या प्रवाशांना पाण्याखाली नेत आहात ते तुमचीच जबाबदारी असून, ते तुमची जबाबदारी आहेत आणि हे सगळं प्रकरण एका संकटाच्या दिशेनं जात आहे’ अशी मागणी जाणकारांनी केल्याचं कॅमरुन यांनी स्पष्टच सांगितलं. ओशनगेट कंपनीकडून या इशाऱ्यांकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष आणि इतक्या गंभीर स्वरुपात दिसलेले त्याचे परिणाम पाहता आता या कंपनीवर रोषाचे ताशेरे ओढले जात आहेत. 

Related posts