Heavy Rainfall In Himachal Pradesh Due To Cloud Burst Watch Here How Cloud Bursts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

What is Cloud Bursting: देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं (Monsoon) आगमन झालं असून काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या (Land Slide) घटना घडत आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी ढगफुटीच्या (Cloud Burst) घटना घडल्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण ही ढगफुटी नेमकी होते कशी? याबद्दल आज जाणून घेऊया.

ढगफुटी म्हणजे काय?

जेव्हा आपण ढगफुटीबद्दल (Cloud Burst) बोलतो तेव्हा सर्वात आधी काळे ढग फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असल्याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. पण नक्की हे असंच घडतं का? वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं, तर ढगफुटीचा अर्थ “अचानक कोसळलेला मुसळधार पाऊस”. भारतीय हवामान विभागाने (IMD) ठरवलेल्या प्रमाणानुसार, एका तासात 100 मिमी पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी म्हणतात. ढगफुटी झाल्यास 100 मिमी किंवा त्याहून जास्त पाऊस अनपेक्षितपणे पडतो.

ढग का फुटतात?

ढग फुटणे (Cloud Bursting) म्हणजे एखाद्या विशिष्ट भागात आकाशातून जोरदार पाऊस कोसळणे. ज्या भागात ढगफुटी होते, त्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. जेव्हा पाण्याने भरलेले ढग ठराविक ठिकाणी थांबतात आणि त्यांच्यातील पाण्याचे थेंब भरपूर प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा ढग फुटतात. पाण्याच्या वजनामुळे ढगांची घनता वाढते आणि वजन न पेलवल्यास ढग फुटतात आणि मुसळधार पाऊस पडतो. जिथे ढगफुटी होते, त्या प्रदेशात 100 मिमी प्रति तास या वेगाने पाऊस पडतो. ठराविक भागात ढगफुटी झाल्याने केवळ तेवढ्या भागातच मुसळधार पाऊस पडतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जास्त प्रमाणात ढगफुटीच्या घटना घडतात, अनेक वेळा ढगफुटीदरम्यान अनेकांचा मृत्यू देखील होतो.

छायाचित्रकार पीटर मायर यांनी ऑस्ट्रियातील मिलस्टाटर सरोवरावरील ढगफुटीची दृश्यं त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली. हा व्हिडीओ पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटलं. ढगफुटी होत असताना नेमकं कसं दृश्य दिसतं, ते पाहा…

ढग फक्त डोंगरावरच फुटतात का?

पूर्वी असा समज होता की ढगफुटी केवळ डोंगरावरच होते. पाण्याने भरलेले ढग डोंगराळ भागात अडकतात आणि पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे डोंगराळ प्रदेशात ढगफुटी होत असल्याचं मानलं जायचं. मात्र, डोंगराळ भाग सोडून इतर भागातही ढगफुटी झाल्याचे अनेक प्रसंग आहेत.

हेही वाचा:

Maharashtra: पावसाळ्यात कुठे फिरायला जायचं हा विचार करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



[ad_2]

Related posts