Horoscope 27 June 2023 : प्रेमसंबधांमध्ये मोठा ट्विस्ट येणार; या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 27 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

अडकलेले पैसे परत मिळतील.  जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये मोठा फायदा होणार. अचानक धन लाभ होईल. प्रेमसंबधांमध्ये नवे वळण येईल.

वृषभ (Taurus)

लव्हमेटकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. मात्र, जादा मेहनत घेण्याची तयारी ठेवावी.

मिथुन (Gemini)

नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागू शकतो. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळू शकते. अविवाहित लोकांचा लग्नाचा योग जुळून येवू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाही तर नोकरीच्या ठिकाणी वाव विवाद होवू शकतात.

कर्क (Cancer)

कामाच्या निमित्ताने प्रवासाचा योग येवू शकतो. नोकरीच्या ठिकाणी दिवस आनंदात जाईल.  सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. नविन व्यवसाय सुरु केल्यास यश मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. 

सिंह (Leo)

अचान धन लाभ होईल. मालमत्ता खरेदीचा योग येवू शकतो. जोडीदाराकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता. कामकाजाचा ताण वाढेल. 

कन्या (Virgo)

राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. समाजात मान सन्मा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.  नोकरी बदलणे किंवा अतिरिक्त उत्पन्न याबद्दल विचार कऱण्यासाठी काळ चांगला आहे. 

तूळ (Libra)

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता होऊ शकते.  व्यवसाय किंवा कोणतीही कार्य हातात घेतली तर ते अर्धवट सोडू नका.

वृश्चिक (Scorpio)

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.  नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.  नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. वेळेवर सहकार्य नसल्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात.

धनु (Sagittarius)

 व्यवसायात चांगला फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होतील. काळजी घ्या, भावनांवर नियंत्रण ठेवा, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय घातक ठरू शकतात. जुन्या समस्यांमधून मुक्तता मिळेल. 

मकर (Capricorn)

घरात नातेवाईकांच्या भेटी होऊ शकतात. वाहन खरेदीचा योग येईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. एखाद्याला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कुंभ (Aquarius)

 मेहनतीचं फळ मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत नवीन नियोजन करणं फायदेशीर ठरेल. लव्हमेटसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना करू शकता. भविष्यासाठी केलेल्या योजना फलदायी ठरतील. जोडीदारासोबत बसून भविष्याची योजना बनवू शकता. 

मीन (Pisces)

वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज सुरू केलेल्या कामाला भविष्यात नक्की यश मिळेल. कामानिमित्ताने केलेला प्रवास लाभदायी ठरेल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts