Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 28 June 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

 देशातील वातावरणात बदल (Climate Change) झाला आहे. सध्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, देशातील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं (IMD) दिला आहे. (वाचा सविस्तर)

एमबीबीएसनंतरची ‘नेक्स्ट’ परीक्षा होणार दोन टप्प्यात, 28 जुलैला मॉक टेस्ट

 ‘नॅशनल एक्झिट टेस्ट’ अर्थात ‘NEXT’ परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.   देशातील 2019 बॅचच्या अंतिम वर्षाच्या MBBS विद्यार्थ्यांची नॅशनल एक्झिट टेस्ट (NEXT) पुढील वर्षी दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात येणार आहे. (वाचा सविस्तर)

ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका 

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

सडकी सुपारी आयात करण भोवलं, म्यानमारसह ईशान्य आशियातील सीमाशुल्क चुकवल्याप्रकरणी एकाला अटक 

सडकी सुपारी आयात केल्याप्रकरणी आरोपी वसीम बावलाला न्यायालयाकडून 30 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने नागपुरात म्यानमारसह ईशान्य आशियातील इतर देशातून सीमाशुल्क आणि इतर कर चुकवून सडकी सुपारी आयात केली होती.  (वाचा सविस्तर)

भारत राष्ट्र समिती पक्षासाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा अन्य विरोधी पक्षांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. कारण 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे. (वाचा सविस्तर)

अमेरिकेनंतर भारतात सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं, नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : गडकरी 

 गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमुळं भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे  झाल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं.  (वाचा सविस्तर)

Horoscope Today 28 June 2023 : मेष, वृषभ, मकरसह ‘या’ राशीच्या लोकांनी आज ‘हे’ काम करू नये; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य 

आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज सर्वांशी प्रेमाने वागतील. कन्या राशीच्या लोकांनी कोणाच्याही सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)

 माजी पंतप्रधान P.V. नरसिंह राव, आंबेडकरी साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्म; आज इतिहासात…

 इतिहासातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे. इतिहासातील काही घटनांची भविष्यातही नोंद घेतली जाते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवरही या घटनांचा परिणाम होत असतो. आजच्या दिवशी इतिहासात काही घटना अशाच घडल्या आहेत. ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांचा राज्याभिषेक आजच्या दिवशी झाला. त्या भारताच्या सम्राज्ञी होत्या. त्यांच्या सत्ताकाळात मोठे बदल झाले. (वाचा सविस्तर)

[ad_2]

Related posts