22 year old died and 3 injured in byculla after tree fall due to havey rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भायखळात मध्यरात्री झाड कोसळून तीन जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. इंदू ऑईल मिल कंपाउंडमध्ये (Indu Oil Mill Compound, Byculla Police) मध्यरात्री २.३० वाजता ही घटना घडलीये.

सध्या जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव रेहमान खान (२२) असं आहे. 

पावसामुळं (Mumbai Rains) अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. 

बुधवारी मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात देखील मुसळधार पावसामुळे एक वृक्ष घरावर कोसळल्याची दुर्घटना घडली. यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रेमलाल निर्मल असे तरुणाचे नाव आहे. वृक्ष कोसळून व्यक्तींचा मृत्यू होण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

दुपारच्या सुमारास गोरेगाव एमजी रोड परिसरातील मिठा नगर महापालिका कॉलनीतील एका घरावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बी/22 ए या घरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. (Rain Update News)

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील प्रेम लाल निर्मल याला जवळच्या प्रार्थना रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची ही आज दिवसभरातील दुसरी घटना आहे आज पहाटे देखील मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात कौशल महेंद्र जोशी या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा

[ad_2]

Related posts