Viral Video: वाघाला पाळीव समजून महिलेने केलं चूक, त्यानंतर जे काही झालं…पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Angry Tiger Viral Video: मांजर, कबूतर, पोपट, गोल्ड फिश, घोडा असो वा कुत्रा, असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय. अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. मात्र तुम्ही कधी वाघ (Tiger) पाळताना ऐकलंय का? ऐकलंही असेल. लहानपणी कुणाच्या तरी तोंडून किंवा कोणा एका सिनेमामध्ये. प्रत्यक्षात याचं प्रमाण अत्यल्प आहे. अशातच वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पिंजऱ्यात बंदिस्त जंगलातील भयंकर प्राण्यांची छेड काढण्याची चूक काही लोक करतात. प्रकरण अंगलट आल्यावर काय होतं, हे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतं. अशातच एक व्हिडिओ देखील व्हायरल (Trending Video) होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये एक मुलगी वाघासोबत मस्ती करण्याची चूक करते.

आणखी वाचा – Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने ‘या’ गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्…

व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्राणीसंग्रहालयातील (zoo) आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, मुलगी वाघाला मिठी मारण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र वाघ अचानक मुलीच्या अंगावर झडप घातलो आणि तिचा हात पकडतो. जणू काही इथून जाऊ नको, मला गोंजारत रहा, असं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र वाघाची झडप पाहून मुलीला घाम फुटल्याचं दिसून येतंय. तरुणीची चांगलीच तारांबळ उडाली. 

पाहा Video

दरम्यान, लोक भयंकर प्राण्यांना कमकुवत समजण्याची चूक करतात, तेच अनेकदा या प्राण्यांचे बळी ठरताना दिसतात. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Angry Tiger Viral Video) सुदैवानं असं काही झालेलं झालं नाही. 5 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलंय. तुम्ही या परिस्थितीत असता तर तुम्ही काय केले असते? करा करा.. विचार करा.

Related posts