Groom Came On Stretcher In An Ambulance For Wedding Due To Fracture In Leg Jharkhand; नवरदेव चक्क रुग्णवाहिकेतून वऱ्हाड घेऊन आला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रांची: झारखंडमधील पलामू येथे एक अनोखं लग्न पाहायला मिळालं. येथे नवरदेव हा घोडीवर नाही तर चक्क रुग्णवाहिकेतून मांडवात वरात घेऊन आला. इतकंच नाही तर त्याने वधूसोबत स्ट्रेचरवर बसून लग्नाच्या साऱ्या विधी पार पाडल्या. पलामू येथील शाहपूर, मेदिनीनगर येथील कोयल रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये लग्न पार पडलं. पण, नवरदेव असा रुग्णवाहिकेतून का आला, याची कहाणीही खूप रंजक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाने हे कोणत्याही प्रसिद्धीसाठी किंवा मौजमजेसाठी केलेले नाही. तर, ही त्याची मजबुरी होती. २५ जून रोजी गढवा जिल्ह्यातील कांडी गावातील रहिवासी चंद्रेश मिश्रा यांचे लग्न पनेरी धरणावर राहणाऱ्या प्रेरणा मिश्रासोबत निश्चित झाले होते. दोघांच्याही कुटुंबात लग्नाची खूप उत्सुकता होती. पण, लग्नाच्या काही दिवस आधी चंद्रेशचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला.

Pune Murder: दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले
पाय बरा होण्यासाठी बराच वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता लग्नाची तारीख बदलण्याचं कुटुंबीयांनी ठरवलं. पण, काहीच दिवसात लग्न असल्याने लग्नाची सारी तयारी झालेली होती. लग्नासाठी हॉटेलचं बुकिंगचं झालं होतं. केटरिंग, बँडवाल्यांना बुक करण्यात बराच खर्चही झाला होता.

अशा परिस्थितीत जर लग्नाची तारीख पुढे ढकलली तर एकतर खर्च केलेले पैसे वाया जातील आणि पुन्हा नव्याने सारा खर्च करावा लागणार होता. त्यामुळे चंद्रेशने आपल्या भावी कुटुंबातील समस्या समजून घेतल्या आणि निश्चित तारखेला लग्न होणार असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगितले. जरी त्याला रुग्णवाहिकेत बसून लग्नमंडपात जावे लागले तरी चालेल. चंद्रेशच्या निर्णयाला घरच्यांनीही होकार दिला.

मुलीला सर्पदंश, रुग्णालयात २ तास तंत्रमंत्र; डॉक्टर बघत बसले, अखेर ज्याची भीती होती तेच घडलं
त्यानंतर ठरलेल्या तिथीला चंद्रेश रुग्णवाहिकेत बसून लग्नस्थळी पोहोचला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर बसवून मांडवात नेण्यात आले. त्यानंतर वधू-वरांने स्ट्रेचरसह सात फेरे घेतले आणि अशा पद्धतीने हा अनोखा विवाह पार पडला.

सनई-चौघडे नव्हे तर राष्ट्रगीताचे सूर अन् हाती संविधानाची प्रत अन्; ४५ वधू-वरांनी बांधली लग्नगाठ

आता हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वजण नवरदेवाचे कौतुक करत आहेत की पाय फ्रॅक्चर असूनही त्याने लग्न पुढे ढकललं नाही. तर, त्याने परिस्थिती समजून घेत ठरलेल्या दिवशी लग्न केलं.

[ad_2]

Related posts