Pakistani Youtuber Took An Interview Of Hindu Minority Boy From Pakistan He Said About Current Situation Of Hindu In Pakistan Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Hindu Minority:   भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही देशांना स्वतंत्र्य होऊन 76 वर्ष पूर्ण होणार आहेत. या दोन्ही देशांना 1947 मध्ये स्वातंत्र मिळाले होते. या अनेक वर्षांमध्ये या दोन्ही देशांनी अनेक बदल पाहिले आहेत. दोन्ही देशांच्या आर्थिक स्थितीत देखील बरीच तफावत आहे. लोकसंख्येविषयी बोलायला गेलं तर भारतात हिंदूंची (Hindu) संख्या ही सर्वाधिक आहे तर पाकिस्तानात मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. 

पाकिस्तानात कायदे आणि नियम हे इस्लामिक धर्मांनुसार आहेत. तर भारत हा लोकशाहीप्रधान आणि संविधानाच्या आधारावर चालणारा देश आहे. दरम्यान पाकिस्तानी यूट्युबर शोएब मलिक याने पाकिस्तानातील एका हिंदू तरुणाशी संवाद साधला. यावेळी त्याने पाकिस्तानातील जिन्हा या भागात हिंदू अल्पसंख्यांकांबरोबर होणाऱ्या अत्याचाराविषयी विचारणा केली. 

‘हिंदूंचा छळ केला जातो’

पाकिस्तानी यूट्युबर शोएब मलिक याने ईदच्या निमित्ताने पाकिस्तानातील कराची मध्ये राहणाऱ्या दिविक कुमार या तरुणाची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान दिविक याने पाकिस्तानातील एकूणच स्थितीविषयी माहिती दिली. याशिवाय दिविक कुमार याने भारतातील अल्पसंख्यांक हिंदूंसोबत तुलना करत पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्यांकांची सद्य स्थिती देखील सांगितली. पाकिस्तानात हिंदूंची स्थिती इतकी गंभीर का आहे असा सवाल या यूट्युबरने दिविक याला विचारला. त्यावर उत्तर देताना दिविक याने म्हटलं की, ‘इथे हिंदूंचा फार छळ केला जातो. त्यांच्या जमिनी त्यांच्यापासून हिसकावून घेतल्या जातात. पाकिस्तानातील मोठ्या शहरांमध्ये हिंदूना त्रास दिला जातो. त्यांना नोकरी मिळवणे देखील कठिण होते.’

पुढे बोलतांना त्याने म्हटलं की, ‘भारतापेक्षा इथे हिंदूंची स्थिती फार गंभीर आहे. भारतात प्रत्येकाला समान संधी दिली जाते. मग तो मुसलमान असो किंवा हिंदू. परंतु पाकिस्तानात असं काहीही नाही. बरेच लोकं म्हणतात की भारतात मुस्लिम लोकांवर अत्याचार करण्यात येतो. परंतु भारतात मुसलमान हे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री देखील होतात. हा जर गुन्हा असेल तर पाकिस्तानातील हिंदूंसोबत देखील असं व्हायला हवं.’

सध्या पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बरीच खालावलेली आहे. तसेच त्यांनी आता इतर देशांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यातच या तरुणाने मांडलेली व्यथा ही पाकिस्तानातील हिंदूंंच्या अवस्थेविषयीचे चित्र स्पष्ट करते. पाकिस्तानातील हिंदूंची ही परिस्थिती सुधारणा का की त्यांना आयुष्यभर हाच त्रास सहन करावा लागणार आहे हे येणारी वेळच ठरवेल. परंतु या परिस्थितीला पाकिस्तानचे सरकार तितकेच जबाबदार आहे यामध्ये शंका नाही. 

हे ही वाचा :

Ayodhya Viral Video: अयोध्येत शरयू नदीच्या तिरावर तरुणीने बनवला इन्स्टा रील, व्हायरल होताच कठोर कारवाई करण्याची साधू-महंतांची मागणी

[ad_2]

Related posts