[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
निरीक्षक शुभम सिंह रात्री ३ वाजता तरुणीला व्हॉट्स अॅपवर मेसेज केले. ‘मी घरात एकटा आहे. तू माझ्या घरी ये,’ असा मेसेज शुभम यांनी केला. त्यावर माझ्या घरी सगळे जण झोपले आहेत. हे ठीक नाही. मी येऊ शकत नाही, असं उत्तर तरुणीनं दिलं. मात्र तरीही शुभम सिंह ऐकायला तयार नव्हते. ‘मी थोडी तुला खाणार आहे. तू माझ्या घरी ये. माझ्या आसपास राहणारे सगळे झोपले आहेत. आता तर झोपही येत नाहीए. तू ये, आपण घरी गप्पा मारु. तुझ्याशी गप्पा मारण्याची इच्छा आहे,’ असं शुभम सिंह यांनी म्हटलं.
तरुणीच्या मामाला गांजा विक्रेत्यांनी मारहाण केली होती. डीसीपींच्या आदेशावरुन गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचा तपास चौकी प्रमुख शुभम सिंह करत होते. त्यांनी तरुणीसोबत रात्री उशिरा केलेलं व्हॉट्स अॅप चॅटिंग व्हायरल झालं. त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर चौकी प्रमुख शुभम सिंह यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गोविंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महादेवनगरमध्ये एक महिला राहते. कुटुंबात मुलगी आणि तिचा लहान भाऊ आहे. वस्तीत राहणारे शरद पासवान, राजू पासवान, मोनी पासवान, नटवर उर्फ छोटू गांजा विकत असल्याचा आरोप महिलेनं केला. महिलेच्या घराबाहेर गांजा विक्री सुरू होती. तिच्या भावानं या विक्रीला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी महिलेच्या भावाला लाठी, काठी, दगड, विटांनी मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे भाऊ अर्धमेला झाला.
पीडित कुटुंबानं डीसीपी दक्षिण यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली. डीसीपींच्या आदेशावरुन गोविंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रतनलाल नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी शुभम सिंह या प्रकरणाचा तपास करत होते. याचा तपास करताना सिंह यांना महिलेच्या मुलीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर तो तिच्याशी व्हॉट्स अॅपवर चॅट करु लागला. सिंह यांनी तरुणीसोबत आक्षेपार्ह शब्दांत चॅटिंग केलं.
[ad_2]