[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
DA Hike: केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. महागाई भत्याचा दर 38 टक्क्यावरून 42 टक्के करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी ते 31 मे दरम्यानचा महागाई भत्ता जूनच्या वेतनामध्ये रोखीने दिला जाणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आलेला आहे.
केंद्राने 3 एप्रिल 2023 रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली होती. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे.
जुलै 2021 मध्ये दीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, आणखी 3 टक्के वाढ देऊन तो 31 टक्के करण्यात आला. मग सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये किती वाढ झाली?
तमिळनाडूच्या राज्यसरकारने महागाई भत्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता तमिळनाडूनत महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत.
हिमाचल, आसाम आणि राजस्थानमध्ये देखील वाढला महागाई भत्ता?
हिमाचल प्रदेशात महागाई भत्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये चार टक्क्यांनी महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. तर आसामध्ये चार टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ही 42 टक्के महागाई भत्ता
उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात 16.35 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 11 लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
[ad_2]