[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jammu Kashmir News : अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित एकाला परफ्यूम आरडी बॉम्बसह अटक (Perfume Ied) करण्यात आल आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एका साथीदाराला शनिवारी, 1 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परफ्यूमच्या बॉटलमधील बॉम्ब सापडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरच्या पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली.
लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक
सैन्य दलाने श्रीनगरमधील बटमालू बसस्थानकावरून दहशतवादी संघटनेसंबंधित एका साथीदाराला अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपीकडून चार परफ्यूम आयईडी (Improvised Explosive Device) सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर अहमद इट्टू असं आरोपीचं नाव असून तो कैमोह येथील गुलशनाबादचा रहिवासी आहे.
One terror associate of LeT namely Yasir Ahmed Ittoo S/o Ab Rashid Ittoo R/o Gulshanabad, Qaimoh arrested with 4 perfume IEDs from Batmaloo Bus Stand. FIR No 77/2023 under sections 3/5 of Explosive Substances act, 7/25 of IA Act & 13,23 of ULAP Act registered in Batmaloo PS. pic.twitter.com/RFPYTCq2Bv
— Srinagar Police (@SrinagarPolice) July 1, 2023
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बटामालू बसस्थानकाजवळून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. दहशतवाला अटक करण्यात आल्यामुळे मोठा कट उधळून लावण्यात प्रशासनाला यश आलं आहे. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 3/5 सह संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध बटामालू पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 1 जुलैपासून वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या प्रचंड सुरक्षा ग्रिड तैनात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा जवानांची करडी नजर आहे.
यापूर्वीही परफ्यूम आयईडी जप्त
या आधीही परफ्यूम आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आला होता. 2 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका सरकारी शाळेतील शिक्षकाकडून परफ्यूम आयईडी जप्त करण्यात आला होता. हा आरोपी लष्कर-ए-तोएबा संबंधित असल्याचं समोर आलं होतं.
अनेक स्फोटांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ असं आरोपीचं नाव आहे. वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बससह अनेक स्फोट घडवण्यात आरोपीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यानंतर परफ्यूम आयईडीबद्दल सांगताना जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी जप्त केलेला हा पहिलाच आयईडी आहे. आयईडी दाबण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा स्फोट होतो.
[ad_2]