Guru Purnima 2023 : आज गुरुपौर्णिमेला 3 शुभ योगामुळे ‘या’ राशींना बक्कळ धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru Purnima 2023 Lucky Zodiac Sign : गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू

आज आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. महर्षी व्यासांच्या काळापासून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी गुरुरूपी आई वडील, शिक्षक आणि आध्यात्मिक गुरुंना भेटवस्तू दिली जाते. आजचा दिवस अजून एका गोष्टीचा शुभ आहे. कारण गुरुपौर्णिमेसोबत आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

गुरु हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करायला शिकवतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरुला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरुला देवासारखं उच्च स्थान देण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रांच्या मते आज गुरुपौर्णिमेला ग्रहांचा विशेष संयोग जुळून आला आहे. या संयोगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.  (Guru Purnima 2023 Lucky Zodiac Sign get money and budhaditya and brahma auspicious yoga)

गुरु पौर्णिमा 2023 शुभ संयोग 

 पंचांगानुसार आज गुरुपौर्णिमेला वाशी, सनफा, बुधादित्य आणि ब्रह्मयोग हे शुभ योगांचा संयोग जुळून आला आहे. तर मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी भद्र योग तयार होत आहे. त्यासोबतच वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी षष्ठ योग जुळून आला आहे. या शुभ योग काळात गुरुची पूजा किंवा आराधना केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. त्यासोबत या शुभ योगांमध्ये गुरूंची दीक्षा घेणं अतिशय भाग्यशाली मानलं जातं. 

ब्रह्मयोग हा आज दुपारी 03.45 वाजेपर्यंत असणार आहे. तर इंद्र योग दुपारी 03.45 वाजेपासून 04 जुलै 2023 सकाळी 11.50 वाजेपर्यंत असेल. 

‘या’ राशींना होणार श्रीमंत 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांना आजची गुरुपौर्णिमा आर्थिक लाभ घेऊन आली आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न असणार आहे. कुटुंबाता आनंदाचं वातावरण असेल. नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. 

मिथुन (Gemini)

आज गुरुपौर्णिमा मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबत यशाचं गणित सापडणार आहे. बँक बॅलन्स वाढणार आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आङे. कुटुंबातील समस्यांचं निरासन होणार असल्याने मनं प्रसन्न आणि आनंदी असणार आहे. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी आज मिळू शकते. 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजची गुरुपौर्णिमा आर्थिक स्थिती मजबूत करणारी ठरणार आहे. यशाचे अनेक मार्ग गवसणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना त्यांच्या फायद्याची बातमी मिळणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts