Odisha Accident Case,ओडिशा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी CBIची मोठी कारवाई; ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, कारणही तसेच… – three railway employees arrested in balasore accident case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानगा येथे २ जून रोजी घडलेल्या तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना शुक्रवारी अटक केली. त्यात दोन अभियंत्यांचा समावेश आहे.

वरिष्ठ सेक्शन इंजिनीअर अरुणकुमार मोहंता, सेक्शन इंजिनीअर महंमद आमिर खान आणि तंत्रज्ञ पप्पूकुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर फौजदारी दंड संहितेच्या कमल ३०४ आणि २०१अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. बहानगा येथे २ जून रोजी कोरोमंडल एक्स्प्रेस लूप लाइनवर थांबलेल्या मालगाडीवर आदळली. त्यानंतर तिचे डबे विरुद्ध बाजूने येणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसवर जाऊन आदळले. या अपघातात २९१ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १००० जण जखमी झाले होते.

अपघात नेमका कसा घडला?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सिग्नल यंत्रणेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वायरना चुकीचे लेबल काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. अपघातादिवशी याच चुकीच्या लेबलांमुळे ट्रॅकवरील सिग्नल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाली आणि चुकीचा सिग्नल दिला गेला. वायरना चुकीचे लेबलिंग केल्याबाबत इशारे मिळूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात नमूद आहे. खरगपूर विभागातही १८ मे रोजी याच प्रकारे चुकीच्या लेबलिंगमुळे चुकीचा सिग्नल दिला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र, त्यानंतर त्या विभागात तातडीने उपाययोजना केल्या गेल्या.

पहाटेची वेळ, रुळावर भलीमोठी वस्तू अन् रेल्वे चालकाचा एक निर्णय; देवगिरी एक्स्प्रेसवरचं विघ्न टळलं

[ad_2]

Related posts