Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 10th July 2023 Saturday Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

1. NCP Political Crisis: शरद पवार की, अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? ‘या’ थ्री टेस्ट फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra News) जनतेनं पुन्हा एकदा अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अजित पवारांनी उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन गटांत विभागली गेली. वाचा सविस्तर 

2. Ajit Pawar: अर्थ,ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा? अर्थ खातं देण्याला शिवसेनेचा विरोध : सूत्र

मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर 

3. New Delhi : दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आज बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

देशांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Monsoon) कहर केला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाने झोडपून टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

4. IMD Rain Update : उत्तर भारतात ‘जलप्रलय’…हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

IMD Rain Update : देशातील अनेक राज्यांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) जोर धरला आहे. सगळीकडे पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.  संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत जवळपास 20 जणांना जीव गमवावा लागला आहे. पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

5. Tomato Price Hike : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात, वाराणसीतील भाजी विक्रेत्याची चर्चा; व्हिडीओ शेअर करत अखिलेश यादव म्हणाले…

Tomato Price Hike : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहे. जिथे कमी दरात टोमॅटो मिळतील तिथे जाऊन खरेदी केली जात आहे. तसंच ते साठवून ठेवले जात आहे. अशाचत वाराणसीमधील (Varanasi) एका व्हिडीओ जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साठ्याच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर (Bouncer) तैनात केले आहेत. वाचा सविस्तर 

6. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर गांधीनगरमधून राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार; 24 जुलैला निवडणूक

S. Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) आज गुजरातच्या (Gujarat News) गांधीनगरमधून (Gandhinagar) राज्यसभेच्या उमेदवारीसाठी (Rajya Sabha Nomination) अर्ज दाखल करणार आहेत. गुजरात (Gujarat), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि गोवामधील (Goa) राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील तीन जागांचा समावेश असून त्यापैकी एका जागेसाठी एस. जयशंकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. वाचा सविस्तर 

7. OP Soni Arrested: बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक; दक्षता पथकाकडून कारवाई

OP Soni Arrested: पंजाबच्या (Punjab Vigilance Team) दक्षता ब्युरोनं रविवारी माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी (Deputy CM Om Parkash Soni) यांना 2016 ते 2022 या कालावधीत बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली अटक केली. भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचं दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ओपी सोनी यांना सोमवारी (आज) अमृतसर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ओपी सोनी तत्कालीन चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. वाचा सविस्तर 

8. लव्ह स्टोरीचा ‘सीक्रेट अँगल’? पाकिस्तानी महिला आणि चिनी नागरिकांची अवैध घुसखोरी, भारताच्या सुरक्षेला मोठा धोका

गेल्या काही दिवसांपासून एक पाकिस्तानी महिला आणि भारतीय नागरिक यांची प्रेमकहाणी जोरदार चर्चेत आहे. पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. वाचा सविस्तर 

9. 10th July In History: भारताच्या दबावानंतर पाकिस्तान झुकलं… आजच्याच दिवशी दिली होती बांग्लादेशला मान्यता; आज इतिहासात 

10th July In History: 10 जुलै हा दिवस म्हटलं तर तो इतर सर्वसामान्य दिवसांसाखाच आहे. पण इतिहासाच्या चौकटीत डोकावून पाहिले तर या दिवसाच्या नावावर अनेक चांगल्या-वाईट घटनांची नोंद झाली आहे. यातील सर्वात महत्त्वाची घटना आपल्या शेजारील बांगलादेशची आहे. खरे तर 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पूर्व पाकिस्तान म्हणजे बांग्लादेश स्वतंत्र झाला. परंतु बांग्लादेशला पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास दोन वर्षे लागली. 1973 मध्ये 10 जुलै या दिवशी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला. 10 जुलै रोजी इतिहासात नोंदवलेल्या आणखी काही घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. वाचा सविस्तर 

10. Horoscope Today 10 July 2023 : आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 10 July 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कन्या राशीच्या लोकांना अभ्यासात काही अडचण येऊ शकते. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts