Chaturgun Papakartari Yoga formed after 200 years difficulties may increase for these zodiac signs health and money loss

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chaturgun Paap Kartari Yog : ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. अशातच आता 200 वर्षांनंतर एक योग तयार होणार आहे. चतुर्गुण पाप कर्तरी योग असं या योगाचं नाव असून काही राशींच्या आयुष्यात हा योग अडचणी घेऊन येणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगणं आवश्यक असणार आहे. 

चतुर्गुण पाप कर्तरी हा अशुभ योग केव्हा तयार होतो ज्यावेळी अशुभ ग्रह कोणत्याही ग्रह किंवा घरातून दुसऱ्या आणि बाराव्या भावात स्थित असतात. या योगामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

हा काळ वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यावेळी आरोग्याशी संबंधित मोठ्या समस्या समोर येऊ शकतात. तसंच खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कितीही प्रयत्न केले तरीही बचत करू शकणार नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक टाळा. जोडीदारासोबतचं नातं तुटू शकतं. 

कर्क रास

हा योग या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण करणार आहे. यावेळी गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी. पालकांच्या आरोग्याची चिंता राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं मन लागणार नाहीये. पदोन्नती न मिळाल्याने निराशा होणार आहे.

कन्या रास

या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे. यासाठी आजूबाजूचे लोकं कारणीभूत ठरू शकतात. काही कारणाने दुखापत देखील होऊ शकते. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका. नवीन नोकरीचा विचार करू नका. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना विचार करा. 

मीन रास

या राशींच्या व्यक्तींना चतुर्गुण पाप कर्तरी योगाचे अशुभ परिणाम मिळणार आहेत. शनी आणि राहूमुळे तुमच्या आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर नोकरीच्या ठिकाणी लोकं वर्चस्व गाजवू शकतात. रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. वाईट संगतीपासून दूर राहा. मानसिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts