[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. त्यातच आता विस्तार आणि खातेवाटपांच्या हालचालींना मोठा वेग आलाय. त्यातील पुढचं पाऊल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत जाणार आहेत. हे दोघे दिल्लीला एकत्र जाणार नाहीत. दिल्लीत भेटतील. आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, राष्ट्रवादी अर्थ खात्यासह काही महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांशी भाजपचे ज्येष्ठ नेते चर्चा करणार का? अशी कुजबूज सध्या रंगलीय</p>
[ad_2]