[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बालाघाट जिल्ह्यातील मगरदरा गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी एका शाळेतील ११ मुलं अचानक आजारी पडली. मुलांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले. त्यांच्यावर येथे उपचार सुरू असून आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहेत.
या घटनेची माहिती पालकांना समजताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. मुलांची अवस्था पाहून शाळा व्यवस्थापनही चिंतेत होते. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णवाहिकेला कळवण्यात आले. काही वेळातच तीन रुग्णवाहिकाही शाळेत पोहोचल्या. त्यानंतर मुलांना जिल्हा रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले. मुलांची अवस्था पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. सध्या सर्व मुलांची प्रकृती सुधारली आहे.
बोरिंगचे पाणी प्यायल्याने मुलं बेशुद्ध पडली
बोरिंगच्या पाण्याने या मुलांची प्रकृती बिघडल्याचं सांगितले जात आहे. शाळेतील मुलांची अवस्था पाहता काही मुलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सकाळी दहाच्या सुमारास मुले शाळेत प्रार्थना करत होती. दरम्यान, आरुषी नावाची विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिने श्वासोच्छवासाचा त्रास, शरीर अकडणे अशी तक्रार केली. यानंतर इतर काही मुलेही आजारी पडली.
याबाबत जिल्हा बालाघाट उपाध्यक्ष शंकरलाल बिसेन म्हणाले की, शाळेतील मुलांची प्रकृती खालावल्याची माहिती मला आली, त्यामुळे मी तातडीने तेथे पोहोचलो. मी पाहिले की काही मुले बेशुद्ध होती, काही मुलांना १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवले आणि मी स्वत: माझ्या कारमधून एका मुलाला रुग्णालयात नेले.
जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, एसडीएमने त्यांना या घटनेची माहिती दिली आहे. मगरदरा येथे गेल्यावर मला या घटनेची माहिती मिळाली. हॉस्पिटल आणि पीएचईची टीमही तपासणीसाठी तेथे पोहोचली होती. ज्यांनी बोरिंग सील केले आहेत. सरपंच पाठक यांनी सांगितले की, मुलं जेवली नव्हती. मुलं फक्त बोरिंगचे पाणी पितात. टाकीचे पाणी वापरले जात नाही. एवढी मुले अचानक आजारी पडण्याची ही पहिलीच घटना आहे.
[ad_2]