Ajit Pawar Will Meet Pm Modi Over Maharashtra Farmers Issues Nda Ncp Crisis About Sharad Pawar Sanjay Raut

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar NDA Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. अजित पवार 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. याबाबत खुद्द अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, ”मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.” या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या (NDA) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार पहिल्यांदाच दिल्ली दरबारी जाणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच दिल्ली दरबारी

बंडानंतर पहिल्यांदाच राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवारांनी पंतप्रधान मोदी यांनी भेटणार असल्याची माहिती दिली आहे. दिल्लीतील एनडीएच्या (NDA) बैठकीचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या 18 जुलैच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकींवर चर्चा करण्यात येणार आहे.

अजित पवार पंतप्रधान मोदींची घेणार भेट

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींकडे आपण शेतकऱ्यांसह राज्याचे विविध प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, ”मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीला उपस्थित राहणार आहोत.”

पाहा व्हिडीओ : एनडीएच्या बैठकीत अजित पवारांना निमंत्रण;आगामी निवडणुकांवर चर्चा

 

अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहेत. अर्थ आणि नियोजन खाते मिळालेल्या अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितलं की, खातेवाटपामुळे ते आणि राष्ट्रवादीचे इतर आमदार खूश आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांच्यासह नऊ आमदार 2 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले होते. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

[ad_2]

Related posts