Port Blair New Terminal Pm Narendra Modi Inauguration 18 July Veer Savarkar International Airport

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Veer Savarkar International Airport Inauguration : भारताच्या अंदमान-निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर विमानतळावरील नवीन टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्धाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 18 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सकाळी 9 वाजता विमानतळावर पोहोचतील, तर दीड तासानंतर पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंदमान-निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट मिळणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क सुधारेल.

अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट

हे पोर्ट ब्लेअर टर्मिनल बेट केंद्रशासित प्रदेशावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पात एकूण 40,800 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाला गती मिळेल यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.

पोर्ट ब्लेअर टर्मिनलसाठी सुमारे 710 कोटींचा खर्च

पोर्ट ब्लेअर टर्मिनलसुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. याशिवाय पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त असलेले ऍप्रनही बांधण्यात आले आहेत. यानंतर आता या विमानतळावर एकावेळी 10 विमाने उभी करता येणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार विमानतळ टर्मिनलची वास्तुशिल्प रचना निसर्गापासून प्रेरित आहे. हे नवं टर्मिनल शंखाच्या आकाराच्या संरचनेसारखं दिसतं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :



[ad_2]

Related posts