NDA Meeting 38 Parties To Join NDA Meeting In Delhi CM Eknath Shinde And Ajit Pawar Will Be Present From Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NDA Meeting : भाजपविरोधी पक्षांची बंगळुरुत आज बैठक (Opposition Meeting) होत असतानाच दिल्लीत भाजपप्रणित एनडीएने (NDA) देखील बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार आहेत. सत्तेचं केंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत संध्याकाळी पाच वाजता एनडीएची बैठक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Aji Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला आणखी कोण-कोण उपस्थित राहणार?

या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंह बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू देखील पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचही नाव चर्चेत आहे. 

शक्तिप्रदर्शनात 38 पक्ष सहभागी होणार : जेपी नड्डा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी माहिती दिली. “ही बैठक सत्ता मिळवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी होत आहे. एनडीएच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनात 38 पक्ष सहभागी होणार आहेत. गेल्या 9 वर्षात एनडीएच्या सर्व पक्षांनी या आघाडीच्या विकासाचा अजेंडा, योजना, धोरणे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहेत, यात रस दाखवला आहे. एनडीएकडे पक्ष उत्साहाने येत आहेत,” असं जेपी नड्डा म्हणाले.

1998 मध्ये 24, आता 38 मित्रपक्ष : भाजप

जेपी नड्डा म्हणाले की, “एनडीएमधून बाहेर पडलेले मित्रपक्षही भारताला मजबूत करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि भाजप आपल्या विचारधारेशी कटिबद्ध आहे. काही वर्षांपूर्वी कृषी कायदे तसंच इतर मुद्द्यांमुळे मित्रपक्ष एनडीएपासून दुरावले होते.” तर “एनडीएच्या मित्रपक्षांची संख्या 1998 मध्ये 24 होती. त्यात वाढ होऊन आता 38 झाली आहे. हे पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं लोकप्रियतेचं लक्षण आहे,” असं पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

विरोधकांची बंगळुरुमध्ये बैठक

विरोधी पक्षांची आज बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. आज बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा

Meeting : विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, शरद पवार राहणार उपस्थित; तर दिल्लीत NDA ची बैठक

[ad_2]

Related posts