Foreigner Kyrgyzstanis Girl Committed Suicide In Raipur After Sent Last Message To Boyfriend; परदेशी तरुणीची रायपूरमध्ये आत्महत्या, बाल्कनीत जाऊन आयुष्य संपवलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रायपूर: किर्गिस्तानमधील एका परदेशी तरुणीने गुरुवारी रायपूरमध्ये आत्महत्या केली. ही मुलगी टॅटू आर्टिस्ट बनण्यासाठी येथे आली होती. सध्या पोलिस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, अशोका रतन येथील एका फ्लॅटमध्ये तरुणी भाड्याने राहत होती. नीना बिडेन्को असे या मुलीचे नाव आहे. रायपूर पोलिस परदेशी तरुणीचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करून दूतावासाच्या माध्यमातून किर्गिस्तान सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. तरुणीने फ्लॅटच्या बाल्कनीत कपड्याच्या ड्रायरला गळफास घेऊन आत्महत्या केली. असे सांगितले जात आहे की तरुणीचे तिच्या प्रियकराशी काही कारणावरून भांडण झाले होते, त्यानंतर तिने प्रियकराला शेवटचा मेसेज पाठवला. यासोबतच तिने त्याची माफीही मागितली.

बायको-मुलांवरील प्रेमाची जादू; एक निर्णय अन् एका रात्रीत त्याने ९० कोटी जिंकले…
माफी मागितल्यानंतर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही तरुणी काही महिन्यांपूर्वीच रायपूरमध्ये राहायला आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पांढरी पोलिस करत आहेत. पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, परदेशी तरुणीचा तिच्या प्रियकराशी कशावरून वाद झाला होता, ज्यासाठी तिने आधी माफीचा संदेश पाठवला आणि नंतर आत्महत्येसारखे पाऊल उचलले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

या प्रकरणाची माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणीच्या मोबाईलवरून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तरुणीचा तिच्या प्रियकरासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. तिने आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकराला मेसेज पाठवला आहे. ‘मी प्रत्येक गोष्टीसाठी माफी मागते. मी तुझं मन दुखवलं आहे. माय लव्ह मला माफ कर. माझ्या मृत्यूची माहिती माझ्या कुटुंबीयांना देशीन’, असं तिने तिच्या अखेरच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.

Khalapur Landslide: अख्खं कुटुंब ढिगाऱ्याखाली, एकटी मुलगी वाचली, खालापूर दुर्घटनेनं जयश्रीचं सारं हिरावून नेलं

[ad_2]

Related posts