Cylinder Blast In Wedding House Bride Mother And Aunt Died In Uttar Pradesh; वरात येणार, लग्नाची सारी तयारी झाली, पण घरात अनर्थ घडला; वधूच्या आई आणि आत्याचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: घरात लग्नाची तयारी सुरु होती. तेवढ्यात घरात भयानक दुर्घटना घडली आणि यामध्ये वधूमाय आणि आत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नापूर्वी घरात दोघांचे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ही घटना घडली आहे.गॅस सिलिंडरची गळती झाली, याबाबत कोणालाच माहिती नव्हती. स्फोट झाल्यावर आगीने रौद्ररुप धारण केलं. या घटनेत आई आणि आत्या दोघीही जीव वाचवण्यासाठी बाहेर पळू लागल्या. मात्र त्यांचा पाय सिलिंडरच्या पाईपमध्ये अडकल्याने दोघेही तिथेच पडल्या. आग इतकी वेगाने पसरली की यामध्ये दोघींचाही होरपळून मृत्यू झाला.

या दरम्यान काही लोकांनी आई आणि आत्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आगीत ते देखील होरपळले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोवळ्या वयातील प्रेम! ७ वीच्या विद्यार्थ्याचं ८ वीतील मुलीशी अफेअर, नको ते करुन बसले, रुग्णालयात जाताच धक्का
अतिरिक्त पोलिस अधीक्षक नृपेंद्र यांनी सांगितले की, नीर गावात संजीव सिंह गौर यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. रविवारी वऱ्हाड येणार होतं. लग्नासाठी घरात पाहुणेही जमले होते. शनिवारी संजीव यांची पत्नी मंजू (४५) या पाहुण्यांसाठी खायला नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. तर, संजीवची यांची बहीण शर्मिला (५०) या देखील त्यांना मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या.

दोघांनी काहीतरी बनवण्यासाठी गॅस पेटवायला घेतला. त्यांनी माचिसची काडी पेटवताच मोठा स्फोट झाला. सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने हा स्फोट झाला. त्यामुळे मोठी लाग भडकली. आग पसरु लागली. आगीपासून वाचण्यासाठी बाहेर पळू लागल्या. मात्र, तेवढ्यात त्यांचा पाय सिलेंडरच्या पाईपमध्ये फसला. त्या जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडू लागल्या. आरडाओरडा ऐकून घरातील लोक त्यांना वाचवण्यासाठी धावले. त्यांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी वेगाने पसरली की त्या दोघींचाही त्यात होरपळून जागीच मृत्यू झाला.
लग्नाच्या तीन महिन्यानंतरही पतीचा मधुचंद्राला नकार, सासूने विचारताच जावयाचं हादरवणारं उत्तर
त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बिट्टा देवी, रेणू आणि रामू हे देखील होरपळलं. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझवली. या आगीच्या घटनेत लग्नाचे बरेच सामानही जळून खाक झाले आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वधू आणि तिच्या वडिलांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे.

[ad_2]

Related posts