PF खात्यासाठी Nominee नोंदवला नसेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसा कोणाला आणि कसे मिळतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

No EPF Nominee How PF Money Will Be Paid: गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असली तरी त्यामध्ये वारसदार म्हणजेच नॉमिनी हा फार महत्त्वाचा भाग असतो. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर गुंतवलेल्या पैशांबरोबरच त्यासंदर्भातील फायदे या वारस असलेल्या व्यक्तीला मिळतात. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंडच्या (EPF) खात्यांचे वारस म्हणून नामांकित केलेल्या व्यक्तीला प्रोव्हिडंट फंडामध्ये जमा झालेल्या निधीचा काही भाग दिला जातो. तसेच खातेदाराचा मृत्या झाल्यास ईडीएलआयचा फायदा, पेन्शनचा निधी या वारसाला मिळतो.

किती पैसे जमा होतात आणि व्याजदर किती?

ईपीएफ स्कीमअंतर्गत कंपनी आणि कर्मचारी काही ठराविक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यामध्ये टाकतो. सामान्यपणे ही रक्कम कर्मचाऱ्याच्या एकूण बेसिक पगार आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के इतकी असते. सध्या ईपीएफओवर दरवर्षाला 8.1 टक्के व्याज मिळते. त्यामुळेच ईपीएफओच्या खातेदारांनी त्यांच्या वारसाचा उल्लेख आपल्या खात्याशी संलग्न माहितीमध्ये करणे आवश्यक असते. म्हणजेच प्रत्येक ईपीएफओ खातेदाराने आपला नॉमिनी कोण आहे याची नोंद करणे आवश्यक असते. एका वेळेस ईपीएफओसाठी एका किंवा एकाहून अधिक लोकांना वारस करता येतं. खातेदार व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना टक्केवारीच्या आधारे वारस निवडता येतं. म्हणजे उदाहरण घ्ययाचं झालं तर आईला 40 टक्के, बाबांना 40 टक्के बहिणीला 20 टक्के असं आपल्या एकूण ईपीएफमधील खात्याच्या पैशांचं विभाजन करता येऊ शकतं. ही टक्केवारी आपल्या इच्छेनुसार निश्चित करता येते.

कोणाला वारस करता येतं?

ईपीएफच्या नियमांनुसार, खातेदार त्याच्या कुटुंबातील एका किंवा अनेक व्यक्तींची वारस म्हणून नोंदणी करु शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीचे कोणीही कुटुंबिय नसतील तर तो त्याच्या इच्छेनुसार जवळच्या व्यक्तीला वारस म्हणून जाहीर करु शकतो. मात्र कुटुंब असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच वारस करता येतं.

वरासांना खात्याकडून मिळतो निधी

नमूद केलेल्या वारसदारांच्या नावाने जितक्या टक्केवारीमध्ये पैसे देण्याचा उल्लेख खातेदाराने केला असेल त्याप्रमाणे खात्याकडून त्या वारसांना निधी दिला जातो.

ई-नॉमिनी सेवा

भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) सर्व खातेदारांना ई-नॉमिनी नमूद करण्याची सूचना केली आहे. खातेदाराचा अचानक मृत्यू झाला तर त्याने ई-नॉमिनेशनच्या माध्यमातून वारस म्हणून नाव जाहीर केलेल्या व्यक्तीला खात्याकडून पैसे दिले जातात. वारसदारांना खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यावरील निधी, निवृत्ती योजना आणि कर्मचाऱ्यांनी गुंतवलेल्या ठेवींशी संलग्न विमा योजना (ईडीएलआय) यासारख्या सुविधा वापरता येतात.

वारस जाहीर केला नसेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर कोणाला मिळतात पैसे?

ईपीएफच्या प्रश्नोत्तराच्या पेजवरील माहितीनुसार, “हा निधी कुटुंबातील सर्व सभासदांमध्ये सामान प्रमाणात वाटून दिला जातो. ईपीएफ स्कीम 1952 च्या परिच्छेद 70 (2) मध्ये याचा उल्लेख आहे. जर त्या व्यक्तीचे कोणीही कुटुंबीय नसतील तर कायदेशीर मार्गाने जी व्यक्ती यासाठी पात्र असेल तिला निधी दिला जातो.” तसेच कुटुंब नसलेल्या व्यक्तीने नमूद केलेल्या वारसाला खातेदाच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्व निधी दिला जातो.

ई-नॉमिनेशन कसं नोंदवावं?

Step 1: EPFO वेबसाईटवर जा तिथे > Services पर्याय निवडा त्यामध्ये > For employees पर्याय निवडता. तिथे > Member UAN/Online Services वर क्लिक करा.

Step 2: UAN किंवा पासवर्ड वापरुन लॉगइन करा.

Step 3: तिथे मॅनेज नावाच्या टॅबमधील ‘E-nomination’ पर्याय निवडा.

Step 4: समोर आलेल्या ऑनलाइन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरुन ‘Save’ पर्यायावर क्लिक करा.

Step 5: त्यानंतर पुढे येणाऱ्या बॉक्समध्ये ‘Yes’ हा पर्याय निवडा. तुमच्या कुटुंबियांना वारस म्हणून नोंदवायचं आहे का? असा प्रश्न या बॉक्समधील मजकुरात विचारलेला असतो.  

Step 6: त्यानंतर Family details वर क्लिक करुन एकाहून अधिक वारसांचा उल्लेख करता येतो.

Step 7: Nomination Details वर क्लिक करुन किती टक्के कोणाला द्यायचं हे निश्चित करु तशी आकडेवारी भरा आणि Save वर क्लिल करा.

Step 8: नंतर E-sign वर क्लिक करा. त्यामुळे ओटीपी जनरेट होईल. नंतर हा ओटीपी समोर दिलेल्या विंडोमध्ये भरा आणि सबमीट क्लिक करा.

Related posts