केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य; भारताने कडक शब्दांत नोंदवला निषेध ‘तुम्ही आमच्या अंतर्गत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर राजधानी राजकीय वातावरण तापलं आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य केलं आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी जाहीर करत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत…

Read More

FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration: मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. दीपोत्सवाचे…

Read More

PF खात्यासाठी Nominee नोंदवला नसेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसा कोणाला आणि कसे मिळतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) No EPF Nominee How PF Money Will Be Paid: गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असली तरी त्यामध्ये वारसदार म्हणजेच नॉमिनी हा फार महत्त्वाचा भाग असतो. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर गुंतवलेल्या पैशांबरोबरच त्यासंदर्भातील फायदे या वारस असलेल्या व्यक्तीला मिळतात. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंडच्या (EPF) खात्यांचे वारस म्हणून नामांकित केलेल्या व्यक्तीला प्रोव्हिडंट फंडामध्ये जमा झालेल्या निधीचा काही भाग दिला जातो. तसेच खातेदाराचा मृत्या झाल्यास ईडीएलआयचा फायदा, पेन्शनचा निधी या वारसाला मिळतो. किती पैसे जमा होतात आणि व्याजदर किती? ईपीएफ स्कीमअंतर्गत कंपनी आणि कर्मचारी काही ठराविक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यामध्ये टाकतो.…

Read More

सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yoga Day Event Guinness World Record: गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी जागतिक योग दिनानिमित्त गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) नोंदवल्याची घोषणा केली आहे. सूरतमध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी योगासने करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये 1 कोटी 25 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्याचं गुजरात सरकारकडून सांगण्यात आलं आहे.  विक्रम मोडीत निघाला संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लाखाहून अधिक…

Read More