केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य; भारताने कडक शब्दांत नोंदवला निषेध ‘तुम्ही आमच्या अंतर्गत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर राजधानी राजकीय वातावरण तापलं आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य केलं आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी जाहीर करत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत…

Read More

अजित डोभाल म्हणाले, “…तर भारताची फाळणी झाली नसती”; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Doval On Subhash Chandra Bose: ‘नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवंत असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांनी शनिवारी केलं. या विधानावरुन काँग्रेसने डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये आयोजित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये डोभाल बोलत होते. नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृती व्याख्यानाच्या पहिल्याच वर्षाच्या कार्यक्रमात डोभाल यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर… अजित डोभाल यांनी…

Read More